मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अब आएगा मजा! iPhone 15 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल, फीचर्स झाली Leak

अब आएगा मजा! iPhone 15 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल, फीचर्स झाली Leak

अब आएगा मजा! iPhone 15 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल, फीचर्स झाली Leak

अब आएगा मजा! iPhone 15 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल, फीचर्स झाली Leak

नुकताच कंपनीनं iPhone 14 लाँच केला आहे. या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता कंपनीनं iPhone 15च्या लाँचची तयारी केली आहे. या फोनशी संबंधित काही माहिती समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 ऑक्टोबर: अत्याधुनिक फीचर्स आणि उच्च दर्जाच्या सिक्युरिटी फीचर्समुळे अ‍ॅपलच्या फोनचे जगभरात चाहते आहेत. एखाद्या व्यक्तीकडे आयफोन असणं हे स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. कारण, आयफोनच्या किमती साधारण फोनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहेत. नुकताच कंपनीनं iPhone 14 लाँच केला आहे. या फोनला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता कंपनीनं iPhone 15च्या लाँचची तयारी केली आहे. या फोनशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. अ‍ॅपलने फोनमध्ये लाइटनिंग चार्जिंग पोर्टची जागा यूएसबी टाइप सी पोर्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या नवीन iPhonesमध्ये आपल्या मालकीचं तंत्रज्ञान आणत असते. पण, यावेळी हे चित्र बदलेलं दिसेल, अशी शक्यता आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

युरोपियन युनियननं अलीकडेच एक कायदा संमत केला आहे. ज्यामध्ये, सर्व स्मार्टफोन निर्मात्यांना 2024 पर्यंत USB टाइप C पोर्टसह हँडसेट लाँच करणं बंधनकारक केलं आहे. सध्या, स्मार्टफोन मार्केटमध्ये या यूएसबी मानकांचं पालन न करणारा Apple हा एकमेव प्रमुख ब्रँड आहे. आयफोनला लाइटनिंग पोर्टसह लाँच केलं गेलं आहे. कंपनीने यूएसबी टाइप सी मानक न स्वीकारण्यामागची कारणंही स्पष्ट केली आहेत. मात्र, 2024 मध्ये युरोपियन मार्केटमध्ये यूएसबी मानकांचे पालन करून आयफोन विकण्याचा विचार सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

हेही वाचा: लिपस्टिकसारख्या चार्जिंग केससह लाँच झालं Nothing Ear Stick, वाचा स्पेसिफिकेशन्स

iPhone 15 मध्ये होणार बदल-

द वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅपल कंपनीचे मार्केटिंग लीड ग्रेग जोसविक यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुलाखतीत ते म्हणाले, "साहजिकच आम्हाला नियामांचं पालन करावं लागेल. आयफोनसाठी यूएसबी टाइप सी पोर्ट स्वीकारण्याची सक्ती केल्यानं आम्ही नाराज आहोत. पण, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही." अ‍ॅपलनं अगोदरच मायक्रो यूएसबी पोर्टवर स्विच केलं असतं तर लाइटनिंग पोर्ट आणि यूएसबी टाइप सी पोर्टचा शोध कधीच लागला नसता, असं जोसविक म्हणाले. आता आयफोन 15 हा सूएसबी टाइप सी पोर्टवर स्विच करणारा सीरिजमधील पहिला स्मार्टफोन ठरू शकतो.

iPad मध्ये मिळतो USB Type-C पोर्ट-

लाइटनिंग पोर्टवरून यूएसबी टाईप सी पोर्टवर स्विच केल्यानं मोठ्या प्रमाणात ई-कचरा होईल, असंही ग्रेग जोसविक यांनी सांगितलं. असं असूनही, कंपनी 2024 पर्यंत किंवा नंतर बंधनकारक बदलांसह आपला हँडसेट लाँच करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, आयफोन-15 हा यूएसबी-सी पोर्ट मिळणारं अ‍ॅपलचं पहिलंच प्रॉडक्ट नसेल. यापूर्वी, 10व्या पिढीच्या आयपॅडकमध्ये आणि मॅक मॉडेलमध्येही सी-टाईप सपोर्ट दिला गेला आहे.

First published:

Tags: Iphone