मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' ब्रँडेड स्मार्टफोन्स, वाचा किंमत अन् फीचर्स

15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' ब्रँडेड स्मार्टफोन्स, वाचा किंमत अन् फीचर्स

15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' ब्रँडेड स्मार्टफोन्स, वाचा किंमत अन् फीचर्स

15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' ब्रँडेड स्मार्टफोन्स, वाचा किंमत अन् फीचर्स

आज आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांत आणि त्यापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम फोनची एक यादी आणली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 15 नोव्हेंबर: भारतात अनेक नवीन फोन 15 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत. पण असे फोन खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, वाढत्या किमती आणि सध्या सुरू असलेला कॉम्पोनंट सप्लायच्या समस्येमुळे तुम्हाला कदाचित एखाद्या डिव्हाइससाठी एक किंवा दोन वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त किंमत मोजावी लागू शकते. याबरोबरच, तुम्ही जर काही वर्षे जुन्या असलेल्या समान किंमतीच्या फोनवरून अपग्रेड करत असाल तर पॉवर, कॅमेरा गुणवत्ता किंवा गुणवत्तेच्या बाबतीत फार मोठ्या सुधारणेची अपेक्षा ठेवू नका.

  या किमतीत तुम्ही मोठ्या, हाय क्वालिटीच्या स्क्रीन, दिवसभर चालणारी बॅटरी, फास्ट चार्जिंग, अपडेटेड सॉफ्टवेअर आणि रोजच्या जीवनात वापरासाठी पुरेसे चांगले कॅमेरे यांची अपेक्षा करू शकता. 5G, स्टिरिओ स्पीकर, हाय डिस्प्ले रीफ्रेश रेट किंवा स्प्लॅश रेझिस्टन्स अशी काही फिचर्सही तुम्हाला मिळू शकतात.

  आज आम्ही तुमच्यासाठी 15 हजार रुपयांत आणि त्यापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या सर्वोत्तम फोनची एक यादी आणली आहे.

  हेही वाचा: जॅकपॉट! अर्ध्या किमतीत घरी आणा हा लोकप्रिय iPhone, पुन्हा मिळणार नाही अशी संधी

  फोनचं नाव आणि  किंमत

  • Redmi 10 Prime- किंमत-13,499 8
  • Realme Narzo 30 5g -किंमत- 14,999 8
  • Redmi Note 10S -किंमत-13,999 8
  • Samsung Galaxy F22- किंमत- 12,999 8

  रेडमी 10 प्राइम

  रेडमी 10 प्राइमचा फॅमिली लुक आहे आणि 90Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.5-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर, एक प्लॅस्टिक फ्रेम आणि मागच्या बाजूस क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे.

  हा स्मार्टफोन MediaTek Helio G88 SoC सपोर्टेड आहे. या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी असून त्याला 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असूनही डे लाइट कॅमेरा परफॉर्मन्स अॅव्हरेज आहे. लो-लाईट इमेज क्वालिटी कमी आहे, जी या फोनच्या मुख्य कमतरतांपैकी एक होती. जरी त्याच्या प्रोसेसरचा प्रभाव आधीसारखा नसला तरी तो चांगला परफॉर्मन्स देतो. त्यामुळे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असल्यास तुम्हाला अपेक्षित असलेल्या इतर गरजा पूर्ण करण्यात Redmi 10 Prime यशस्वी ठरेल.

  रिअलमी नार्झो 30 5G

  Realme Narzo 30 5G हा एक स्लिम 5G स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले, चांगली बॅटरी बॅटरी लाइफ आणि मिड-लेव्हल गेमिंग परफॉर्मन्स आहे. स्टिल आणि व्हिडिओ या दोन्हीसाठी कॅमेरा फार चांगला तसेच यामध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा नाही. या फोनमध्ये तुम्हाला Realme UI आणि अनेक प्री-इन्स्टॉल केलेले अॅप्स मिळतात. हा फोन फास्ट चार्ज होत नाही, याचे चार्जिंग थोडे हळू होतं. त्यामुळे जर तुम्हाला 5G फोन हवा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर Narzo 30 5G हा फोन घेण्याचा विचार तुम्ही करू शकता.

  सॅमसंग गॅलेक्सी F22

  सॅमसंगचा गॅलेक्सी F22 हा एक बेसिक बजेट स्मार्टफोन आहे. या फोनची बॅटरी लाइफ मोठी आहे. यात एक व्हायब्रंट 6.4-इंच 90Hz HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. पण इतर सर्व फीचर्स यामध्ये तुलनेने कमी आहेत. याची बॅटरी दोन दिवस सहज टिकते, परंतु हा फोन चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो. कॅमेरा परफॉर्मन्स अगदीच ठीक आहे. 1080p पर्यंत मर्यादित असूनही डेलाइट व्हिडिओ क्वालिटी चांगली आहे. Galaxy F22 चे डिझाईन चांगले आहे. या फोनचा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 आणि प्लॅस्टिक युनिबॉडीने बनवलेला आहे. फोन घेताना तुम्ही विविड डिस्प्ले आणि चांगली बॅटरी लाइफ याला प्राधान्य देत असाल तर Galaxy F22 हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

  रेडमी नोट 10S

  Redmi Note 10S हे Redmi Note 10 चं थोडं जास्त पॉवरफूल व्हर्जन आहे. दोन्ही फोन सारखेच दिसतात. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 सह 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. Redmi Note 10S मध्ये स्टिरिओ स्पीकर आणि IR emitter आहे, जे शक्यतो या बजेट स्मार्टफोन्समध्ये येत नाहीत. Note 10S मध्ये 6GB RAM सह MediaTek Helio G95 SoC पॅक आहे. तुम्हाला 64GB आणि 128GB स्टोरेजच्या फोनपैकी तुमच्या आवडीचा निवडू शकता. ते MIUI 12.5 च्या Android 11 वर चालते. यात बरेच प्री-इन्स्टॉल केलेले अॅप्स आहेत जे अधूनमधून स्पॅमी नोटिफिकेशन पुश करतात. Note 10S मध्ये 5,000mAh बॅटरी असून बॉक्समध्ये 33W चार्जर येतो.

  Xiaomi Redmi Note 10S मध्ये 64-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप असतो. तुम्हाला आणखी चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर Redmi Note 10S पेक्षा Redmi Note 10 खरेदी करणे जास्त योग्य राहील.

  First published:

  Tags: Smartphone