Home /News /technology /

10 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत Made In India SUV Car, जाणून घ्या फिचर्स

10 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत Made In India SUV Car, जाणून घ्या फिचर्स

देशातल्या वाहन निर्मात्या कंपन्यांनी आकर्षक आणि परवडेल अशा दरांत कार उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या कार कोणत्या, कारची फीचर्स कोणती आणि त्या किती फायदेशीर आहेत, हे जाणून घ्या.

नवी दिल्ली, 16 एप्रिल: नवी फीचर्स आणि चांगल्या सुविधा असलेल्या कार खरेदी करण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. परंतु, नवीन तंत्रज्ञानामुळे कारच्या किमती सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना नवीन कार खरेदी करता येत नाही. हीच गरज ओळखून देशातल्या वाहन निर्मात्या कंपन्यांनी आकर्षक आणि परवडेल अशा दरांत कार उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या कार कोणत्या, कारची फीचर्स कोणती आणि त्या किती फायदेशीर आहेत, याबद्दल माहिती देणारं वृत्त 'दैनिक जागरण'नं प्रसिद्ध केलं आहे. टाटा नेक्सॉन देशातली प्रसिद्ध वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ही कार सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते. टाटा नेक्सॉन ही देशातली दुसरी सर्वात सुरक्षित सबकॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. या कारला ग्लोबल एनकॅपकडून 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटाच्या या सर्वात आकर्षक कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही इंजिनाचे पर्याय उपलब्ध आहेत. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन असे दोन्ही प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही इंजिन पेट्रोलमध्ये 170 Nm आणि डिझेलमध्ये 260Nm चा पिक टॉर्क जनरेट करण्यासह 110hp इतकी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 7.04 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. तसंच टॉप व्हेरिएंटची किंमत 13.35 लाख रुपयांपर्यंत आहे. टाटा पंच नवी टाटा पंच (Tata Punch) या पोर्टफोलिओमध्ये नेक्सॉनच्या खालोखाल आहे. BS6 निकषांनुसार टाटा पंच ही कार 1.2 लिटर, तीन सिलिंडर, पेट्रोल इंजिनसह विक्री केली जात आहे. या कारचं इंजिन 84.8 hp ची ऊर्जा आणि 113 Nm चा पिक टॉर्क जनरेट करतं. कारचं इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटीसह मिळते. इंधन बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक इंजिन स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह मिळते. सुरक्षेच्या निकषांमध्ये या कारला एनकॅपकडून 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. नव्या टाटा पंचची किंमत 5.67 लाख रुपयांपासून ते 9.09 लाख रुपयांपर्यंत आहे. ही दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत आहे. टाटा पंचमध्ये अँड्राइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, 7.0 इंचाचा डिजिटल टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलँप, 6 स्पिकर इत्यादी फंक्शन्स पाहायला मिळतात. महिंद्रा XUV300 देशातली वाहन निर्माता कंपनी महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कंपनीच्या सेगमेंटमधली सर्वात प्रसिद्ध कारपैकी एक आहे. पेट्रोल आणि डिझेल इंधनावर चालणाऱ्या या कारमध्ये पाच सीट्स आहेत. ग्लोबल एनकॅपनं महिंद्रा एक्सयूव्ही 300 कारला 5 स्टार म्हणजेच पंचतारांकित रेटिंग दिले आहे. त्यामुळे देशातली ही सर्वात सुरक्षित एसयूव्ही आहे. या कारमध्ये 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं जात आहे. हे इंजिन 108.59 HP ची ऊर्जा तसंच 200Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशननं सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे कारमध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजिनही देण्यात आलं आहे. हे इंजिन 115 bhp इतकी ऊर्जा आणि 300Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 8,41,499 लाख रुपये (दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत) आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Car

पुढील बातम्या