फेसबुकवर तब्बल 230 अॅप चोरी करताय तुमची माहिती,अशी घ्या खबरदारी !

फेसबुकवर तब्बल 230 अॅप चोरी करताय तुमची माहिती,अशी घ्या खबरदारी !

फेसबुकवर असे थोडेथोडके नाहीतर 230 अॅप आहे जे तुमची माहिती चोरी करत आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुठे फिरायला जाणार एवढंच काय तर कुणासोबत सेल्फी काढला याबद्दल प्रत्येक माहिती फेसबुक ठेवत असतो.

  • Share this:

21 नोव्हेंबर : जगभरात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनालिटिक्स फर्म केंम्ब्रिज एनालिटिकाने फेसबुकवर 5 कोटी पेक्षा जास्त युझर्सची खासगी माहिती गोळा केली आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत या डेटाचा वापर केला असा गंभीर आरोप केंम्ब्रिज एनालिटिकावर करण्यात आलाय. या आरोपानंतर जगभरात खळबळ उडाली असून युझर्स फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहे. सोशल मीडियावर #deletefacebook ट्रेंड सुरू आहे. मात्र, यावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने कोणताही खुलासा केला नाही.

पण  जितकं आपण स्वत:ला ओळखतो त्यापेक्षा जास्त फेसबुक आपल्याला ओळखतो.कळत-नकळत फेसबुकवरुन आपण अनेक अॅपमध्ये लॉग इन करत असतो.फेसबुकवर असे थोडेथोडके नाहीतर 230 अॅप आहे जे तुमची माहिती चोरी करत आहे. या माहितीच्या आधारे तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुठे फिरायला जाणार एवढंच काय तर कुणासोबत सेल्फी काढला याबद्दल प्रत्येक माहिती फेसबुक ठेवत असतो.  त्यामुळेच फेसबुक आपली माहिती कशी ग ोळा करतो आणि त्याचा कसा वापर करतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

फेसबुकद्वारे आपण 'या' अॅपशी जोडले जातो

- फेसबुकच्या 'setting'या पर्यायात गेल्यानंतर त्यात उजव्या बाजूला एक लिस्ट येते.

त्यात 'App' या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर त्यात तुम्हाला अनेक अॅप दिसतील. हेच सगळे अॅप तुम्ही फेसबुकद्वारे रोज वापरत असतात.

फेसबुक 'लॉगइन लोकेशन' पासून ते 'डिव्हाईस नेमपर्यंत' आपली सगळी माहिती ठेवतो

- फेसबुकच्या 'setting'मध्ये गेल्यानंतर 'सिक्युरिटी आणि लॉग इन' असा एक पर्याय आहे. यात गेल्यानंतर आपल्याला समजतं की, आपण आपलं फेसबुक अकाऊंट कोणकोणत्या ठिकाणाहून आणि कोणकोणत्या डिव्हाईसमधून वापरलं आहे.

- त्यामुळे काही कारणास्तव जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कंम्प्युटरवर जाऊन आपलं फेसबुक अकाऊंट उघडलं आणि बंद करायचं विसरुन गेला तर पुढच्या वेळेस 'सिक्युरिटी आणि लॉग इन'मध्ये जाऊन तुम्ही ते बंद करू शकता.

तुमच्या आवडीनुसार फेसबुक तुम्हाला जाहिराती दाखवतो

The display screen of an integrated Yandex.Auto in-car connected service system showing a road navigation map sits on the dashboard of a Toyota Motor Corp. Rav4 automobile during a preview event at the headquarters of Yandex NV in Moscow, Russia, on Tuesday, Sept. 19, 2017. Yandex NV, the maker of Russia’s most-popular internet search engine, has created a set of services for some connected Toyota Motor Corp. and Tata Motors Ltd vehicles sold in the country as it seeks to expand beyond desktop and smartphones. Photographer: Alexander Zemlianichenko Jr./Bloomberg

- आपल्या सर्चलिस्टनुसार फेसबुक आपल्याला जाहिराती दाखवतो. त्यामुळे आपली आवड-निवड ही फेसबुकलाही समजते बरं का!

- आता फेसबुक तुम्हाला कोणत्या जाहिराती दाखवतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर 'setting'मध्ये दावून 'Ads' या पर्यायावर क्लिक करा.

- त्यात तुमच्या लक्षात येईल की फेसबुक आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दाखवतो.    

काही जाहिराती आपल्या वैयक्तिक माहितीशी संबंधित असतात

The display screen of an integrated Yandex.Auto in-car connected service system showing a road navigation map sits on the dashboard of a Toyota Motor Corp. Rav4 automobile during a preview event at the headquarters of Yandex NV in Moscow, Russia, on Tuesday, Sept. 19, 2017. Yandex NV, the maker of Russia’s most-popular internet search engine, has created a set of services for some connected Toyota Motor Corp. and Tata Motors Ltd vehicles sold in the country as it seeks to expand beyond desktop and smartphones. Photographer: Alexander Zemlianichenko Jr./Bloomberg

- फेसबुकवर आपण आपलं प्रोफाईल बनवतो त्यात आपली सगळी माहिती शेअर करतो.  

- आपल्या कामापासून ते आपण विवाहित की सिंगल, आपलं शिक्षण यापर्यंत सगळी माहिती आपण शेअर करत असतो. याच माहितीच्या आधारावर फेसबुक आपल्याला जाहिराती दाखवत असतो.

त्यामुळे यातून आपल्या वैयक्तिक माहितीशी कोणी खेळत नाही ना? फेसबुकच्या अपूर्ण माहितीमुळे आपण धोक्यात तर नाही ना येणार? या सगळ्या बाबींची योग्य ती माहिती ठेवा.

First published: March 21, 2018, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading