मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता AC करेल एअर प्युरिफायरचं काम, काय आहे तंत्रज्ञान अन् किंमत? वाचा सविस्तर

आता AC करेल एअर प्युरिफायरचं काम, काय आहे तंत्रज्ञान अन् किंमत? वाचा सविस्तर

आता AC करेल एअर प्युरिफायरचं काम, काय आहे तंत्रज्ञान अन् किंमत? वाचा सविस्तर

आता AC करेल एअर प्युरिफायरचं काम, काय आहे तंत्रज्ञान अन् किंमत? वाचा सविस्तर

या डिव्हाइसमध्ये बसवलेले एअर फिल्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरच्या सहकार्यानं विकसित केलं गेलं आहे आणि ते अँटी मायक्रोबियल एअर प्यूरिफिकेशन टेक्नोलॉजीने सुसज्ज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 19 नोव्हेंबर: आयआयटी-कानपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) बेंगळुरू येथील संशोधकांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे एसी म्हणजेच एअर कंडिशनरला एअर प्युरिफायरमध्ये रूपांतरित करेल. हिवाळ्यात काम करणारे हे तंत्र किफायतशीर ठरेल. शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की, देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळं लोकांचा श्वास कोंडला जात असताना, हिवाळ्यात हा शोध अनेकांसाठी वरदान ठरू शकतो.

चला जाणून घेऊया, हे तंत्रज्ञान काय आहे, ते कसं काम करेल, त्याची किंमत काय असेल आणि वायू प्रदूषणात लोकांसाठी ते कसं फायदेशीर ठरेल…

एसीवर बसवता येते-

आयआयटी-कानपूरचे प्रभारी प्रोफेसर अंकुश शर्मा म्हणाले की, या तंत्राद्वारे एक साधं आणि सोपं उपकरण विकसित केलं गेलं आहे, जे एसीच्या वर सहजपणे स्थापित करता येऊ शकतं. ते म्हणाले, 'एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत याची चाचणी घेण्यात आली आहे आणि ते 99.24 टक्के कार्यक्षमतेसह SARS-CoV-2 अगदी कोरोनाचे डेल्टा प्रकार यशस्वीरित्या निष्क्रिय करण्यात सक्षम असल्याचं सिद्ध झाले आहे.'

जगाला आवश्यक असलेला शोध-

संस्थेच्या स्टार्टअप इनोव्हेशन अँड इनक्युबेशनचे सह-प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय म्हणतात की हे स्वदेशी क्रांतिकारक नवकल्पनांच्या जागतिक बाजारपेठेत हे तंत्रज्ञान जागा मिळवू शकतं. ही सुरुवात जगाच्या गरजेचा आविष्कार आहे आणि वायू प्रदूषणासारख्या महत्त्वाच्या समस्येवर उपाय ठरू शकते.

हेही वाचा: आता कॉलवर नंबरच नाही तर नावही येणार, कुणीच राहणार नाही अनोळखी, नवीन सेवा लवकरच!

फॅन मोड चालू करून वापरता येईल-

प्रा.शर्मा म्हणाले की, थंडीच्या काळात वायू प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये ही समस्या लक्षात घेऊन एक साधं आणि सोपं तंत्र विकसित करण्यात आलं आहे. हे उपकरण एसीमध्ये सहजपणे स्थापित केलं जाऊ शकतं. यानंतर एसीचा फॅन मोड चालू करून ते वापरता येईल. एसीमधून बाहेर येणारी हवा पूर्णपणे शुद्ध असेल आणि प्रदूषणाचे कण आणि विषाणू काढून टाकले जातील.

अँटी-मायक्रोबियल शुद्धीकरण तंत्रज्ञान-

या उपकरणामध्ये बसवलेले एअर फिल्टर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोरच्या सहकार्यानं विकसित केलं गेलं आहे आणि ते सूक्ष्मजीवविरोधी वायु शुद्धीकरण तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे. प्रा. अंकुश यांनी सांगितले की, त्याची NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आहे.

सध्या बाजारात 8-10 हजार रुपयांना मिळणारे एअर फिल्टर पार्टिकल कॅप्चर (कण) प्रणालीवर काम करतात आणि सतत वापरल्यानं ते फिल्टरमध्ये जमा होतात. अशा परिस्थितीत पेट्री डिशप्रमाणे ते जंतूंचे प्रजनन केंद्र बनते. त्याच वेळी, नवीन शोधात अशी कोणतीही अडचण नाही.

PM 2.5, PM 10 आणि जंतूंपासून संरक्षण-

प्रा. अमिताभ बंदोपाध्याय यांच्या मते, हे यंत्र हवा शुद्ध करताना PM 2.5, PM 10, इतर धुळीच्या कणांसह जंतू पकडण्यास सक्षम आहे स्टार्टअप इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरने स्टार्टअप एयर्थला परवाना दिला आहे.

हे उपकरण फक्त 2000 रुपयांच्या किमतीत क्लीन एअर मॉड्यूलच्या रुपात लाँच केलं गेलं आहे. रिपोर्ट्सनुसार, एअरथच्या वेबसाइट आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरून हे डिव्हाइस खरेदी केलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Tech news