नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : जगभरात टेस्ला (Tesla) कार ऑटोपायलटमुळे (Autopilot) प्रसिद्ध आहे. पण कंपनीने आता काही ग्राहकांसाठी फुल सेल्फ ड्रायव्हिंग मोड रोलआउट (Full Self-Driving)केला आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी मंगळवारी ट्विट करत याबाबत माहिती दिली. या आठवड्यात काही ठराविक ग्राहकांसाठी पहिलं सेल्फ ड्रायव्हिंग मोड बीटा सॉफ्टवेअर अपडेट पाठवण्यात आलं असून ते या वर्षाच्या अखेरीस रिलीज केलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
(वाचा - Honda फेस्टिव्ह ऑफर्स :2 व्हीलर्स घेण्यासाठी सुवर्णसंधी; हजारोंची सूट, भरपूर बचत)
टेस्लाच्या अर्ली ऍक्सेस प्रोग्राम अंतर्गत, जे ड्रायव्हर्स शहरातील रस्त्यांवर ऑटोपायलट मोडमध्ये गाडी चालवण्यास सक्षम आहेत, त्यांनाच हे सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येणार आहे. सुरुवातीला ऍक्सेस प्रोग्रामचा वापर, टेस्टिंग प्लॅटफॉर्मच्या रुपात केला जातो. जेणेकरून सॉफ्टवेअर बग्स ट्रॅक केला जाऊ शकेल. या सॉफ्टवेअर अपडेटसाठी अतिशय सावधगिरी बाळगली जात असल्याचं मस्क यांनी सांगितलं.
टेस्ला कारचे सीईओ एलोन मस्क यांनी ऑटोपायलट मोड एक सुरक्षित ड्रायव्हिंग पर्याय असल्याचा दावा केला आहे. गाडी सेल्फ ड्रायव्हिंग मोडमध्ये असेल तरीही, सेफ्टीसाठी ड्रायव्हरचे हात स्टेअरिंगवर असणं गरजेचं आहे. ऑटोपायलट कारचं स्टेअरिंग, एक्सीलरेट आणि ब्रेक ऑटोमॅटिक पद्धतीने चालतात, ही कार केवळ लेनवर चालते. परंतु कोणत्याही व्यक्तीशिवाय ती इनेबल केलं जाऊ शकत नाही.
अमेरिकी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Tesla 2021 मध्ये भारतात येणार असल्याचं बोललं जात आहे. मस्क यांनी ट्विटरवर याबाबत संकेत दिले आहेत.
(वाचा - Hydrogen Fuel वर चालणाऱ्या देशातील पहिल्या कारचं यशस्वी ट्रायल)