मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Telegram चे नवे अपडेट जारी, हे अ‍ॅप देतंय WhatsApp पेक्षाही वरचढ फीचर्स

Telegram चे नवे अपडेट जारी, हे अ‍ॅप देतंय WhatsApp पेक्षाही वरचढ फीचर्स

अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp vs Telegram) पर्याय म्हणून टेलिग्राम (Telegram) अ‍ॅपचा वापर करतात. टेलिग्राम अ‍ॅप आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झालं आहे.

अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp vs Telegram) पर्याय म्हणून टेलिग्राम (Telegram) अ‍ॅपचा वापर करतात. टेलिग्राम अ‍ॅप आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झालं आहे.

अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp vs Telegram) पर्याय म्हणून टेलिग्राम (Telegram) अ‍ॅपचा वापर करतात. टेलिग्राम अ‍ॅप आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झालं आहे.

  मुंबई, 05 नोव्हेंबर: अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपला (Whatsapp vs Telegram) पर्याय म्हणून टेलिग्राम (Telegram) अ‍ॅपचा वापर करतात. टेलिग्राम अ‍ॅप आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगली सेवा देण्यासाठी सज्ज झालं आहे. अ‍ॅपमधल्या नवीन अपडेटमुळे युजर्सना शेअर केलेल्या मीडिया फाइल्स हाय-स्पीड स्क्रोलिंग (High-Speed Scrolling) आणि कॅलेंडर व्ह्यूमध्ये (Calendar View) पाहणं शक्य होणार आहे. अ‍ॅपमध्ये शेअर्ड मीडिया पेजसाठी (Shared Media Page) नवीन डेट बार देण्यात आला आहे. यामुळं युजर्सना आता महिना आणि तारखेनुसार फोटो आणि व्हिडीओ शोधणं खूप सोपं होणार आहे.

  या नवीन अपडेटमध्ये ग्रुप अ‍ॅडमिनला नियंत्रणाचे जास्त अधिकार देण्यात आले आहेत. कोण चॅट पाहू शकतं किंवा त्यामध्ये सामील होऊ शकतं, या गोष्टी आता अ‍ॅडमिनला ठरवता येणार आहेत. टेलिग्रामच्या नवीन अपडेटमध्ये ग्लोबल चॅट थीमसह नवीन इंटरअ‍ॅक्टिव्ह इमोजीदेखील (Interactive emoji) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आयओएस (iOS) टेलिग्राम युजर्सना शेअर्ड लोकेशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळदेखील दाखवला जाणार आहे. अशा प्रकारचं फीचर अद्याप व्हॉट्सअ‍ॅपमध्येही आलेलं नाही.

  हे वाचा-WhatsApp मध्ये होणार हा मोठा बदल, रोजच्या वापरातील हे महत्त्वाचे फीचर बदलणार

  कॅलेंडर व्ह्यूचा फायदा

  शेअर्ड मीडिया पेजसाठी एक नवीन कलेंडर व्ह्यू देण्यात आला आहे. यामुळे युजर्सना विशिष्ट तारीख टाकून मीडिया फाइल्स शोधता येतील. चॅट हेडरवर टॅप करून आणि नंतर खाली स्क्रोल करून तुम्ही शेअर केलेले फोटो किंवा व्हिडिओ फिल्टरदेखील करू शकता. त्यानंतर मेनू आयकॉनवर क्लिक करून त्यांचा अ‍ॅक्सेस मिळवू शकता. शेअर केलेल्या मीडिया फाइलच्या तारखेवर पोहोचल्यानंतर, तुम्ही झूम-इन किंवा झूम-आउट करून ती पाहू शकता. संपूर्ण गॅलरीसाठी हे फीचर कार्य करतं. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या सोयीनुसार मीडिया फाइल्स पाहू शकता.

  ग्रुप किंवा चॅनल अ‍ॅडमिनला मिळाले जास्त अधिकार

  टेलिग्रामच्या नवीन अपडेटमध्ये अ‍ॅडमिनसाठी प्रीव्ह्यू ऑप्शन देण्यात आला आहे. जेव्हा एखादा युजर पाठवलेल्या इनव्हाइट लिंकवर क्लिक करेल, तेव्हा अ‍ॅडमिन अ‍ॅप्रूव्हल (Admin Approval) फीचर आपोआप सक्रिय होईल. अ‍ॅडमिनकडे रिक्वेस्ट पाठवण्यासाठी युजर्सना एक बटण मिळणार आहे. एकदा युजरनं रिक्वेस्ट पाठवली की, अ‍ॅडमिन चॅटच्या वर असलेल्या नवीन बारद्वारे ती रिक्वेस्ट मॅनेज करू शकतो. अ‍ॅडमिन ही रिक्वेस्ट स्वीकारू शकतो आणि नाकारू शकतो. तो युझरची बायो इन्फॉर्मेशन आणि पब्लिक प्रोफाइल फोटो पाहू शकतो.

  हे वाचा-चुकूनही वापरु नका WhatsApp चं हे अनधिकृत वर्जन; Account होऊ शकतं बॅन

  iOS युजरना माहिती होणार ट्रान्झिट टाइम

  टेलिग्रामच्या नवीन अपडेटमध्ये, आयओएस म्हणजे अ‍ॅपल युझर्सना शेअर केलेल्या लोकेशनवर जाण्यासाठी लागणारा वेळसुद्धा सांगितला जाणार आहे. म्हणजे ती व्यक्ती तिच्या सध्याच्या ठिकाणाहून इच्छित ठिकाणी किती वेळात पोहोचू शकेल, हे अगोदरच समजणार आहे. यासाठी युझरला शेअर्ड लोकेशनवर क्लिक करावं लागेल. आयओएस 15च्या स्टाइलसोबत ताळमेळ बसावा यासाठी टेलिग्रामच्या सेटिंग्ज नव्यानं डिझाइन करण्यात आल्या आहेत. याशिवाय फुलस्क्रीन इफेक्टसह नवीन इंटरअ‍ॅक्टिव्ह इमोजीदेखील युजर्सना मिळणार आहेत. आयओएस युजर्सना टेलिग्राम अनेक नवीन फीचर्स देणार आहे. यातील काही गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपमध्येसुद्धा नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामध्ये तथ्य असल्यास अँड्रॉइड युझर्सनादेखील या फीचर्सची प्रतीक्षा असणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Social media, Whatsapp