नवी दिल्ली, 5 डिसेंबर : टेलिकॉम कंपन्यांची (telecom companies) संस्था COAI ने दूरसंचार विभागाला पत्र लिहून लवकरात लवकर 5G ट्रायल (5G Trial) सुरू करण्याची मागणी केली आहे. COAI नुसार, जानेवारीमध्ये 5G ट्रायलसाठी अर्ज करण्यात आला होता, परंतु अद्याप सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. 5G स्ट्रेक्ट्रम ट्रायलमध्ये होणाऱ्या विलंबामुळे आता टेलिकॉम कंपन्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टेलिकॉम कंपन्यांनुसार, 5G च्या ट्रायलसाठी सरकारने 2018 मध्ये कमेटी तयार करून काम सुरू केलं होतं. परंतु आतापर्यंत 5G ट्रायलसाठी स्ट्रेक्ट्रमचं वाटप करण्यात आलेलं नाही.
आता COAI ने दूरसंचार विभागाला केवळ पत्र लिहून 5G ट्रायलचीच मागणी केली नाही, तर काही इतर मागण्याही केल्या आहेत. या कंपन्यांनी, 5G ट्रायल स्ट्रेक्ट्रमसाठी कमीत-कमी 1 वर्षाचा वेळ दिला जावा, कोणत्याही लोकेशनवर ट्रायलची परवानगी देण्यात यावी असं म्हणलंय.
कंपन्या आपल्या गरजेनुसार, उपकरणांची लोकेशन बदलू शकतील. लॅब ट्रायलसाठी कोणत्याही वेंडरच्या निवडीसाठी मंजुरी मिळावी. मेक इन इंडिया सॉल्यूशन लावण्यासाठी वेगवेगळ्या मंजुरी घेण्याची गरज नसावी, ट्रायल घेण्यासाठी बाहेरून मागवण्यात आलेल्या कोणत्याही उपकरणावर इंपोर्ट ड्यूटी नसावी, अशा मागण्या आहेत.
#AwaazStory | #Telecom कंपनियों की संस्था @ConnectCOAI ने दूरसंचार विभाग को चिट्ठी लिखकर जल्द से जल्द 5G ट्रायल शुरू करने की मांग की है। देखिए @aseemmanchanda की रिपोर्ट | pic.twitter.com/1CYhFHqyMM
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) December 4, 2020
सरकार आतापर्यंत चायनिज कंपन्यांना 5G ट्रायल पासून बाहेर ठेवायचं की नाही हा निर्णय घेऊ शकलेली नाही. आतापर्यंत 5G ट्रायल सुरू होऊ शकलेलं नाही. दूरसंचार विभागाने 5G सेवांचा रोडमॅप तयार करण्यासाठी आठ वर्किंग ग्रुप तयार केले आहेत. हा ग्रुप आपला रिपोर्ट याच महिन्यात सरकारकडे सोपवू शकते. या वर्किंग ग्रुपमध्ये चायनीज कंपन्यांही सामिल करण्यात आलं आहे.
अनेक देशांमध्ये 5G सुरू झालं आहे. मात्र भारत आतापर्यंत याच्या ट्रायलवरही निर्णय घेऊ शकलेला नाही. त्यामुळे भारतीय ग्राहकांना 5G सेवांसाठी मोठी वाट पाहावी लागणार आहे.