Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

8 हजारांहून कमी आहे या जबरदस्त स्मार्टफोनची किंमत; 36 दिवस चालणार 6000mAh बॅटरी

8 हजारांहून कमी आहे या जबरदस्त स्मार्टफोनची किंमत; 36 दिवस चालणार 6000mAh बॅटरी

टेक्नो कंपनीच्या (Tecno Company) नवीन फोनच्या माध्यमातून युजरला तब्बल 36 दिवसांचा बॅटरी बॅकअप (Battery Backup) मिळू शकतो.

टेक्नो कंपनीच्या (Tecno Company) नवीन फोनच्या माध्यमातून युजरला तब्बल 36 दिवसांचा बॅटरी बॅकअप (Battery Backup) मिळू शकतो.

टेक्नो कंपनीच्या (Tecno Company) नवीन फोनच्या माध्यमातून युजरला तब्बल 36 दिवसांचा बॅटरी बॅकअप (Battery Backup) मिळू शकतो.

नवी दिल्ली, 16 जून : सध्या स्मार्टफोनचे (Smartphone) अनेक कंपन्यांचे वैविध्यपूर्ण मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार फोनची निवड करत असतात. परंतु, त्यातही जास्त बॅटरी बॅकअप असलेल्या स्मार्टफोन्सला ग्राहकांकडून अधिक मागणी असते. आता अशा ग्राहकांसाठी अजून एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. टेक्नो कंपनीच्या (Tecno Company) नवीन फोनच्या माध्यमातून युजरला तब्बल 36 दिवसांचा बॅटरी बॅकअप (Battery Backup) मिळू शकतो.

टेक्नोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन टेक्नो स्पार्क 7 टी (Tecno Spark 7 T) पहिल्या सेलच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला आहे. हा सेल 15 जून रोजी दुपारी 12 वाजता अमेझॉन इंडियावर (Amazon India) सुरु झाला आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी या एकाच वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत 8999 रुपये आहे. फोनवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही दिला जात आहे. या डिस्काऊंटनंतर हा फोन 7999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

8 हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये 48 मेगापिक्सल AI रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच या स्वस्तातील फोनमध्ये वटाइम लॅप्स, स्लो मोशन, AI पोर्टेट, स्माईल शॉट असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

(वाचा - ATM ट्रान्झेक्शनआधी कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्यामुळे पिन चोरी होत नाही? वाचा सत्य)

टेक्नोच्या या फोनमध्ये 6.5 इंची एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझोल्युशन फोनमध्ये 720 *1600 मेगापिक्सल असेल. यात डिस्प्लेचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रिन बॉडी रेश्यो 90.34 टक्के आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉट डिस्प्ले डिझाईन आणि थिक बेजेल्ससह उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉईड 11 बेस्ड HiOS 7.6 वर काम करतो. कंपनीने यात मीडियाटेक हिलीयो (Mediatek Helio) G35 चिपसेट प्रोसेसर दिला आहे. हा प्रोसेसर हायपर इंजिन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.

या स्वस्तातील फोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा -

कंपनीने हा फोन 3 कलर्स ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. फोनमध्ये रिअरमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एक AI लेन्सचाही समावेश आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

(वाचा - स्कॅम अ‍ॅड्सद्वारे युजर्सची फसवणूक, News Feed वर बनावट जाहिराती कशा ओळखाल?)

फोनमध्ये 6000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीमुळे 36 दिवस स्टँड बाय वेळ, 41 तासांचा कॉल टाईम, 18 तास वेब ब्राऊजिंग आणि 29 तास व्हिडीओ प्लेबॅक करणं शक्य असल्याचा दावा फोनच्या कंपनीने केला आहे.

First published:

Tags: Smartphone, Tech news