• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Super! फास्टेस्ट चार्जिंगसह मिळेल 7000 mAh ची बॅटरी, अवघ्या 10999 मध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन

Super! फास्टेस्ट चार्जिंगसह मिळेल 7000 mAh ची बॅटरी, अवघ्या 10999 मध्ये खरेदी करा हा स्मार्टफोन

बजेट स्मार्टफोन (Smart phone) विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही कमी किमतीमध्ये चांगल्या बॅटरी बॅकअप स्मार्टफोनच्या (battery backup mobile) शोधात असाल तर तुमच्यासाठी Tecno Pova 2 हा चांगला पर्याय ठरू शकतो.

  • Share this:
नवी दिल्ली, 04 सप्टेंबर: बजेट स्मार्टफोन (Smart phone) विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही कमी किमतीमध्ये चांगल्या बॅटरी बॅकअप स्मार्टफोनच्या (battery backup mobile) शोधात असाल तर तुमच्यासाठी Tecno Pova 2 हा चांगला पर्याय ठरू शकतो. 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येणाऱ्या Tecno Pova 2 स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये आणि 6 GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये आहे. या फोनमध्ये 7,000 mAh ची बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आज जवळजवळ प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे. स्मार्टफोन घेताना विविध माहिती घेतली जाते. परंतु काहीवेळा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनला देखील बॅटरीची समस्या उद्भवते. पैसा खर्च करूनही जर फोनची बॅटरी खराब झाली, तर एवढ्या महागड्या फोनचा काय उपयोग? त्यामुळे तुम्हाला कमी किंमतीमध्ये चांगल्या दर्जाची बॅटरी असणाऱ्या स्मार्टफोनची माहिती देत आहोत. हा स्मार्टफोन म्हणजे Tecno Pova 2. या स्मार्टफोन बद्दल अधिक जाणून घेऊयात. हे वाचा-JioPhone Next या दिवशी होणार लॉन्च, 'रिचार्ज' पेक्षाही कमी पैसे द्यावे लागणार! या फोनमध्ये 6.9-इंचचा डिस्प्ले आहे, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080 आहे. हा फोन हेलियो G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये G52 MC2 जीपीयू वापरले आहे. 4 GB RAM आणि 64GB स्टोरेज, 6 GB RAM आणि 128GB स्टोरेज अशा दोन प्रकारांत हा फोन येतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज (mobile storage) वाढवता येते. अँड्रॉइड 11 (android mobile) च्या HiOS 7.6 वर चालणाऱ्या Tecno Pova 2 या फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ग्राहकाला यूएसबी टाइप-सी पोर्ट, डबल सिम सुविधा, 4G सेवा, एफएम रेडिओ आणि ब्लूटूथ 5.0 सारख्या अनेक सुविधा मिळतील. Tecno Pova 2 स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 48 MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP एआय कॅमेरा सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. हे वाचा-देशातल्या सर्वांत मोठ्या कार कंपनीला धक्का, उत्पादन थेट 40 टक्क्यांनी होणार कमी! अॅमेझॉनवर (Amazon) हा स्मार्टफोन खरेदी करताना निवडक बँकांच्या नो-कॉस्ट ईएमआय (No-cost EMI) सुविधेचा लाभही घेता येईल. सिटी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर हा ईएमआय भरण्यासाठी केला तर 1250 अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड मिळेल. कमी किंमतीमध्ये चांगला बॅटरी बॅकअप असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Tecno Pova 2 हा उत्तम पर्याय ठरू शकेल.
First published: