वोडाफोनकडून ग्राहकांसाठी 'छोटा प्लॅन, बडा धमाका'!

वोडाफोनकडून ग्राहकांसाठी 'छोटा प्लॅन, बडा धमाका'!

वोडाफोनच्या प्रीप्रेड युझर्ससाठी कंपनीकडून नवा प्लॅन, 69 रुपयांमध्ये मिळणार 'या' सुविधा.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर: टेलिकॉम कंपन्यांमध्ये जिओनंतर सर्वात जास्त लोकप्रिय असणारी कंपनी म्हणजे वोडाफोन. वोडाफोन कंपनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर घेऊन येत असते. यावेळी मात्र वोडाफोनने युझर्ससाठी छोटा प्लॅन बडा धमाका आणला आहे. प्रीपेड युझर्ससाठी आता 69 रुपयांचा प्लॅन असणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 250 MB 4G आणि 2G डेटा मिळेल.

वोडाफोन सतत वेगवेगळ्या स्कीम ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत असतं. सध्या प्रीपेड युझर्ससाठी अनलिमिटेड कॉल, इंटरनेट आणि एसएमएससाठी 199 रुपयांचा रिचार्ज करावा लागत आहे. याशिवाय सिम सुरू ठेवायचं असल्याल 35 रुपयांचा वेगळा रिचार्ज प्रतिमहिना करावा लागत आहे. 199, 299, 399 अशा पद्धतीचे रिचार्ज सध्या उपलब्ध आहेत मात्र त्यापेक्षाही कमी दरात जास्ती लाभ घेण्याची संधी आता वोडाफोन देणार आहे.

45, 35, 95, 145, 245 रुपयांचा ऑल राउंडर रिचार्ज काही महिन्यांपूर्वी वोडाफोनने लाँच केला होता. त्यातील 65 रुपयांचा रिचार्ज कंपनीकडून बंद करण्यात आला. आता वोडाफोन 69 रुपयांचा नवा प्लॅन ग्राहकांसाठी घेऊन आला आहे. त्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडिटी, 250 एमबी 4 जी आणि 2 जी डेटा मिळेल. एकूण 17 सर्कलसाठी हा प्लान लागू करण्यात आला आहे. हा रिचार्ज थोडा वेगळा असेल यामध्ये टॉकटाईमसाठी वेगळे चार्जेस लागणार आहेत.

दूसरे नेटवर्कसोबत बोलण्यासाठी फ्री कॉलिंग सुविधा मिळणार

फ्री कॉलिंगची सुविधा जिओकडून बंद करण्यात आल्यानंतर वोडाफोनने खास ग्राहकांसाठी एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कसोबत बोलता यावं यासाठी वोडाफोन असलेल्या स्किम व्यतिरीक्त जादा पैसे आकारणार नाही असंही म्हटलं आहे. यासोबतच एअरटेलनंही ही घोषणा केल्याची माहिती मिळत आहे.

JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा; ग्राहकांना दिलासा

जिओचे फ्री कॉलिंग बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर Reliance Jio ने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जिओच्या कार्डवर 9 ऑक्टोबरपूर्वी रिचार्ज केला आहे, ते त्यांचा रिचार्ज संपेपर्यंत नॉन जिओ युजर्सनादेखील फ्री कॉल (free calling)करू शकतात. हा रिचार्ज (IUC recharge) संपल्यानंतर मात्र जिओच्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कच्या (non jio) मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.जिओने गुरुवारी फ्री कॉलिंगसंदर्भातल्या त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आणि 6 पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारणं सुरू केलं. जिओ नंबरवरून दुसऱ्या कुठल्या मोबाईल नेटवर्कच्या नंबरला कॉल करण्यासाठी हे शुल्क आकारलं जाणार आहे.

पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading