48 MP कॅमेरा असणारा फोन लवकरच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

48 MP कॅमेरा असणारा फोन लवकरच लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

फोन घेण्याचा विचार करताय? मग जरा थांबा चार कॅमेरा असलेला हा बेस्ट फोन लवकरच येत आहे. जाणून घ्या फीचर्स.

  • Share this:

मुंबई: वीवोने नुकसतीच एस सीरिज लाँच केली होती. एस सीरिजच्या यशस्वी विक्रीनंतर आता वीवो 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्ट फोन ग्राहकांसाठी आणणार आहे. भारतात 9 डिसेंबरला वीवोकडून V Series मधील सगळ्या बेस्ट आणि अॅडवान्स फिचर असणारं मॉडेल लाँच केलं जाणार आहे. वीवो कंपनीने काही दिवसांपूर्वी रूसमध्ये V Seriesमधला V17 मोबाईल लाँच करण्यात आला होता. त्यामुळे 9 डिसेंबरला भारतात वीवोकडून V17 लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मोबाईलच्या मॉडेलला ड्युड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.

फिचर्समध्ये आतापर्यंत सर्वात दमदार असणारं हे मॉडेल असेल असा कयास व्यक्त केला जात आहे. वीवोचे मोबाईल हे जास्त फोटो आणि सेल्फीसाठी तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे वीवोने आता 48 मेगा पिक्सेल कॅमेरा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

काय आहेत नव्या फोनचे फिचर्स

6.38 फुल स्क्रीन HD आणि सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले सोबत या मोबाईलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरही मिळणार आहे. मोबाईलला 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. 256 GB मेमरी तुम्ही वाढवू शकणार आहात. Vivo V17 मोबाईलच्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलंत तर एक डायमंड-शेप कॅमरा तुम्हाला दिसेल.

चार कॅमेरे असणारा वीवोमधील बेस्ट फोन

आतापर्यंत वीवोमध्ये दोन आणि तीन कॅमेरे असणारे मोबाईल आले. काही मॉडेल्सना मोबाईलच्या वरच्या बाजूला दोन कॅमेरे असणारी मॉडेल्सही आले. मात्र वीवो आता एकसाथ 4 कॅमेरे असणारं मॉडेल घेऊन येत आहे. 48 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर तर 8 आणि 2 मेगा पिक्सलचे दोन असे एकूण 4 कॅमेरे असणार आहेत. या मोबाईलसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 4500 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर चार्जिंगसाठी यूसीबी टाइप-C पोर्ट देण्यात आलं आहे. कनेक्टिविटीसाठी डुअल सिम, 4G VoLTE, ब्लुटूथ 5.0 सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading