मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /नोकरीसाठी आता रोबोट करणार तुमची निवड, जाणून घ्या काय असेल मुलाखतीचं स्वरूप

नोकरीसाठी आता रोबोट करणार तुमची निवड, जाणून घ्या काय असेल मुलाखतीचं स्वरूप

लवकरच सर्व कंपन्यांमध्ये उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी रोबोट आणला जाणार आहे. प्रयोगिक तत्वावर याची सुरुवात फेडरल बँकेनं केली आहे.

लवकरच सर्व कंपन्यांमध्ये उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी रोबोट आणला जाणार आहे. प्रयोगिक तत्वावर याची सुरुवात फेडरल बँकेनं केली आहे.

लवकरच सर्व कंपन्यांमध्ये उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी रोबोट आणला जाणार आहे. प्रयोगिक तत्वावर याची सुरुवात फेडरल बँकेनं केली आहे.

    मुंबई, 22 नोव्हेंबर: नोकरीसाठी मुलाखत घेण्यासाठी कंपनीतील HR किंवा बॉस असतो मात्र आता हे चित्र बदलताना पाहायला मिळणार आहे. तुमची मुलाखत आता एक रोबोट (Robot will take Interview) घेणार आहे. हा प्रयोग पहिल्यांदा फेडरल बँकेनं केला. प्रायोगिक तत्वावर रोबोट फेडरल बँकेत होणाऱ्या मुलाखती घेणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं एक टूल तयार करण्यात आलं आहे. FedRecruit या टूलद्वारे ही मुलाखत घेतली जाणार आहे. भरतात पहिल्यांदाच HR ऐवजी रोबोट मुलाखत घेणार आहे. जेव्हा तुमची नियुक्ती होईल तेव्हा तुम्ही शेवटच्या राऊंडला HRला भेटू शकणार आहेत. मात्र बाकी मुलाखतीचे टप्पे हा रोबोटच घेणार आहे.

    कसं असेल मुलाखतीचं स्वरूप?

    FedRecruit वेगवेगळ्या आधारांवर मुलाखतीला येणाऱ्या तरुणाची पारख करु शकणार आहे, कॅन्डिडेटची आकालन क्षमता, बुद्धीमत्ता, चिकाटी, निरीक्षण क्षमता हजरजबाबीपणा या सगळ्या गोष्टी एकाचवेळी रोबोट यशस्वीरित्या तपासू शकणार आहे. मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराला अंक दिले जातील. या अंकांच्या आधारावर रोबोटिक इंटरव्यू, साइकोमेट्रिक आणि खेळ आधारीत असतील. अंकांच्या आधारावर रोबोट तुमचं परीक्षण करणार आहे.

    फेडरल बँकेच्या HR chifने इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार रोबोटिक इंटरव्यूमुळे उमेदवाराचे व्यक्तिमत्व जाणून घेणं अधिक सोप होईल. वर्च्युअल फेस टू फेस इंटरव्यूसाठी व्हिडिओचा वापर केला जाणार आहे.

    Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, या छोट्याशा चुकीमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

    मुलाखतीनंतर असं असेल ऑफर लेटर देण्याचं स्वरूप

    निवडलेल्या उमेदवाराला SMS केला जाणार आहे. उमेदवाराला ऑफऱलेटर पाठवण्याचं कामही चॅटबॉक्स करणार आहे. ऑक्टोबर 2019 रोजी बँकेनं परीक्षेद्वारे 350 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण निवड करण्याचं टारर्गेट 700 लोकांचं आहे. त्यापैकी प्रायोगिक तत्वावर 350 लोकांपैकी 150 लोकांची निवड या रोबोटने केली आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सध्या राबवला जात आहे. मात्र भविष्यात HR किंवा बॉस ऐवजी अशा प्रकारे जर रोबोट इंटरव्यू घेण्यासाठी आला तर आश्चर्य वाटायला नको.

    " isDesktop="true" id="420693" >

    First published:
    top videos

      Tags: Interview, Robot, Techonology