मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ALERT! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये लवकरच बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप, या लिस्टमध्ये तुमच्या फोनचा तर समावेश नाही?

ALERT! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये लवकरच बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप, या लिस्टमध्ये तुमच्या फोनचा तर समावेश नाही?

 मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही, तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोजचीही (Photos) अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते.

मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही, तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोजचीही (Photos) अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते.

मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही, तर ऑडिओ (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोजचीही (Photos) अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते.

पुढे वाचा ...

   मुंबई, 11 जानेवारी-   मेसेजेसची देवाण-घेवाण करण्यासाठी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी सेवा म्हणजे व्हॉट्सअॅप मेंसेजर (WhatsApp Messenger). व्हॉट्सअॅपच्या मदतीनं फक्त मेसेजच नाही, तर ऑडिओ  (Audio), व्हिडिओ (Video) आणि फोटोजचीही (Photos) अगदी सहजपणे देवाणघेवाण करता येते. मेटाची (Meta) ही मेसेजिंग सेवा आपल्या अॅपमध्ये सतत नवनवीन बदल करत आहे. आता वार्षिक अपडेट म्हणून व्हॉट्सअॅपनं काही जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन मॉडेल्समध्ये आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2022 मध्ये सुमारे 50 आयफोन्स   (iPhones) आणि अँड्रॉइड्समध्ये   (Androids) व्हॉट्सअॅप काम करणं बंद करू शकतं. या यादीमध्ये आयफोन 6एस (iPhone 6S), आयफोन एसई (iPhone SE), सॅमसंग गॅलेक्सी फोन्स   (Samsung Galaxy phones), सोनी एक्सपिरिया एम   (Sony Xperia M), एचटीसी डिझायर 500 (HTC Desire 500), एलजी ऑप्टिमस एफ 7   (LG Optimus F7) यांसारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

  अँड्रॉइड 4.1 (Android 4.1) आणि आयओएस 9 (iOS 9) व त्यापूर्वीची ऑपरेटिंग सिस्टीम असणारे स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणं बंद होणार आहे. Sproutweird च्या एका रिपोर्टनुसार, ब्राझीलमधल्या (Brazil) अनेक जुन्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद पडणार आहे. ब्राझीलमध्ये सुमारे 100 मिलियन व्हॉट्सअॅप युझर्स (Whatsapp Users) आहेत. भारतासह इतर देशांमध्ये हा बदल लागू होणार आहे की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.

  2022मध्ये खालील अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद -

  आर्चोज 53 प्लॅटिनम, एचटीसी डिझायर 500, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, मिनी सॅमसंग गॅलेक्सी S3, कॅटरपिलर कॅट बी15, सोनी एक्सपिरिया एम, टीएचएल डब्ल्यू 8, zte ग्रँड एक्स क्वाड व्ही 987, ZTE ग्रँड मेमो, सॅमसंग गॅलेक्सी ace 2, एसजी ल्युसिड 2, एलजी ऑप्टिमस F7, एलजी ऑप्टिमस L3 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L5 II, एलजी ऑप्टिमस L5 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L3 II, एलजी ऑप्टिमस L7 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L7 II, एलजी ऑप्टिमस F6, एलजी अॅक्ट, एलजी ऑप्टिमस L4 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F3, एलजी ऑप्टिमस L4 II, एलजी ऑप्टिमस L2 II, एलजी ऑप्टिमस F3Q, विको सिंक फाइव्ह, विको डार्कनाइट, सॅमसंग गॅलेक्सी Xcover 2, ह्युवाई Ascend G740, झेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, लिनेव्हो A820, ह्युवाई Ascend मेट, झेडटीई V956 – UMI X2, ह्युवाई Ascend D2, सॅमसंग गॅलेक्सी कोर, Faea F1 या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही.

  2022 मध्ये खालील आयओएस फोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद -

  अॅपल आयफोन SE (16GB), अॅपल आयफोन SE (32GB), अॅपल आयफोन 6S (64GB), अॅपल आयफोन 6S Plus (128 GB), अॅपल आयफोन 6S Plus (16GB), अॅपल आयफोन 6S Plus (32GB), अॅपल आयफोन 6S Plus (64GB), अॅपल आयफोन SE (64GB), अॅपल आयफोन 6S (128 GB) A, अॅपल आयफोन 6s (16 GB), अॅपल आयफोन 6S (32GB) या आयओएस फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. व्हॉट्सअॅप बंद होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी मोठी आहे. सुरुवातीला ब्राझीलमध्ये लागू करण्यात येणार हा निर्णय जगभरात लागू केला गेला, तर लाखो युझर्सना याचा फटका बसू शकतो.

  First published:

  Tags: Smartphones, Whatsapp