मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कासवाहूनही स्लो झालाय स्मार्टफोन? मग फक्त करा या सेटिंग्स; सुपरफास्ट होईल स्पीड

कासवाहूनही स्लो झालाय स्मार्टफोन? मग फक्त करा या सेटिंग्स; सुपरफास्ट होईल स्पीड

 सुपरफास्ट होईल स्पीड

सुपरफास्ट होईल स्पीड

काही वेळा एखादं गॅजेट वापरताना स्मार्टफोन स्लो झाल्यास समस्या निर्माण होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी:  आजकाल स्मार्टफोन गरजेची वस्तू बनला आहे. अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्याने स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. सध्या मार्केटमध्ये विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. युजर्स त्यांच्या गरजेनुसार स्मार्टफोन खरेदी करतात. सर्वसामान्यपणे स्मार्टफोनचा परफॉर्मन्स हा महत्त्वाचा घटक असतो. काही वेळा एखादं गॅजेट वापरताना स्मार्टफोन स्लो झाल्यास समस्या निर्माण होतात. अर्थात यामुळे बॅटरीवरही परिणाम होतो. स्मार्टफोन स्लो होऊ नये, त्याचा परफॉर्मन्स उत्तम राहावा यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया. `नवभारत टाइम्स`ने या विषयीची माहिती दिली आहे.

स्मार्टफोनचा परफॉर्मन्स युजर्ससाठी महत्त्वाचा असतो. स्मार्टफोन स्लो झाल्यास युजर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखादे गॅजेट वापरताना स्मार्टफोन स्लो होणं आणि त्यामुळे बॅटरीवर परिणाम होणं, अशा प्रकारच्या समस्यांमुळे युजर्स हैराण होतात. काही टिप्सचा वापर करून तुम्ही स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चांगला ठेऊ शकता.

बऱ्याचदा आळस किंवा अन्य कारणामुळे आपण फोनमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्याकडे दुर्लक्ष करतो. पण हे अयोग्य आहे. फोन सातत्याने अपडेट करणं गरजेचं आहे. यामुळे डिव्हाइसचा परफॉर्मन्स सुधारतो. बग्जपासून मुक्ती मिळते. जर वेळोवेळी स्मार्टफोन अपडेट केला तर फोनचा स्पीड, परफॉर्मन्स चांगला राहतो. कनेक्टिव्हिटी चांगली मिळते.

स्मार्टफोनचा स्क्रीन आकर्षक दिसावा यासाठी आपण बऱ्याचदा लाइव्ह वॉलपेपर सेट करतो. पण फोन स्लो होण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. यामुळे फोनच्या सीपीयूवर जास्त ताण येतो. त्यामुळे फोन स्लो होतो आणि परफॉर्मन्सवर प्रतिकूल परिणाम होतो.

फोनमधील काही अ‍ॅप्सचा वापर आपण फारसा करत नाही. एका अर्थाने ही अ‍ॅप्स निरुपयोगी असतात. अशा अ‍ॅप्समुळे स्मार्टफोन स्लो होतो. जर तुमच्या फोनमध्ये ब्लॉटवेअर कमी असतील तर तुमचा फोन फास्ट चालेल. स्मार्टफोनमधील विजेट्स काही वेळा अ‍ॅक्टिव्हेट राहतात आणि बॅकग्राउंडला ते सुरू असतात. यामुळे फोनमधील बॅटरी लवकर संपते आणि फोनदेखील स्लो होतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये कमीत कमी विजेट्सचा वापर करावा.

जर तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनल मेमरी पूर्ण भरली असेल तर स्मार्टफोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे सातत्याने फोनमधील अनावश्यक डॉक्युमेंट्स, फाइल्स, व्हिडिओज आणि इमेजेस डिलीट करणं गरजेचं आहे. यामुळे फोनमधील स्पेस रिकामी राहते आणि फोनचा स्पीड वाढतो.

First published:

Tags: Smartphone, Technology