मुंबई, 29 डिसेंबर- अँड्रॉइड 12 (Android 12) हे अँड्रॉइडचं सर्वात लेटेस्ट व्हर्जन असून बहुतांश स्मार्टफोनवर ते अद्याप उपलब्ध झालेलं नाही. अजूनही अनेक मोबाईल डिव्हाइसमध्ये अँड्रॉइड 11 किंवा त्यापूर्वीची व्हर्जन्स आहेत. असं असूनही गुगलनं (Google) अँड्रॉइडच्या पुढील व्हर्जनची घोषणा केली आहे. गुगलनं अँड्रॉइड 13ची (Android 13) घोषणा केली असून त्याचं नाव 'तिरामिसू' (Tiramisu) असण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, जर गुगलनं आपल्या वार्षिक टाइमलाइनचं पालन केलं, तर हे नवीन व्हर्जन पुढील वर्षातील (2022) फेब्रुवारीमध्ये फर्स्ट राऊंड डेव्हलपर टेस्टसाठी उपलब्ध होईल. एका रिपोर्टमध्ये अँड्रॉइड 13चे फीचर्स लीक झाले आहेत.
हा रिपोर्ट एक्सडीए (XDA) डेव्हलपर्सकडून मिळाला आहे. एक्सडीएनं आपल्या सूत्रांच्या मदतीनं या नवीन अँड्रॉइड व्हर्जनच्या पहिल्या बिल्टचे काही स्क्रीनशॉट मिळवले आहेत. या स्क्रीनशॉट्समधून अँड्रॉइड 13 ची चार फीचर्स उघड होत आहेत. या व्यतिरिक्त हे नवीन व्हर्जन तुमच्या स्मार्टफोनच्या एकूण कार्यक्षमतेलाही ऑप्टिमाईज करू शकतं. नवीन व्हर्जनच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अनावश्यक नोटिफिकेशन्सपासून मिळेल सुटका-
अँड्रॉइड 13, तुमच्या फोनवर येणाऱ्या अनावश्यक नोटिफिकेशन्सपासून सुटका करू शकतं. स्क्रिनशॉटमध्ये दाखवण्यात आलं आहे की, नोटिफिकेशन्स कंट्रोल (Notifications control) करण्यासाठी परमिशन मॅनेजरमध्ये प्रायव्हसी सेटिंगमध्ये एक नवीन पर्याय देण्यात आला आहे. हा ऑप्शन तुम्हाला तुमच्या फोनचं लोकेशन, मायक्रोफोन, फोनमधील फाईल्स आणि अॅप्स मॅनेज करण्याची सुविधा देतो. प्रत्येक अॅपसाठी एक पॉप-अप दिसू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला त्या अॅपच्या नोटिफिकेशनसाठी विचारणा केली जाऊ शकते. जसं नवीन अॅप्स इन्स्टॉल करताना फोन स्टोरेज आणि फाइल्सचा अॅक्सेस (File access) मागितला जातो तशी ही प्रक्रिया असेल.
प्रत्येक अॅपसाठी असेल वेगळी लँग्वेज-
नवीन अँड्रॉइड व्हर्जनमध्ये कोणतंही अॅप तुमच्या आवडीच्या भाषेत वापरण्याचा ऑप्शन मिळेल. अँड्रॉइडचे अनेक युजर्स मल्टिलिंग्वल आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन गुगलनं आता नवीन अँड्रॉइडच्या सिस्टम सेटिंगमध्ये 'अॅप लँग्वेज'चा (App Language) ऑप्शन दिला आहे. या फीचरमध्ये तुम्हाला अॅपसाठी उपलब्ध असणाऱ्या भाषा दिसतील. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही एखादं अॅप हिंदीमध्ये तर दुसरं अॅप तमिळ किंवा इंग्रजीमध्ये वापरू शकता.
(हे वाचा:फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज! नव्या वर्षात लाँच होणार Xiaomi 11i )
लॉक स्क्रीनसाठी नवीन लेआउट-
नवीन अँड्रॉइड युजर आता लॉक स्क्रीनच्या (Lock Screen) क्लॉक लेआउटला टॉगल करू शकतात. आत्तापर्यंत हे क्लॉक सेंटमध्ये आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर क्लॉक वर जातं आणि नोटिफिकेशन क्लिअर केल्यानंतर पुन्हा सेंटरला येतं. परंतु नवीन अँड्रॉइड व्हर्जनमध्ये, क्लॉक कायमस्वरूपी लॉक स्क्रीन लेआउटच्या टॉपला ठेवता येईल.अँड्रॉइड 13 मध्ये तुम्हाला काही फीचर्स ऑन किंवा ऑफ करण्यासाठी टॉगल ऑप्शन मिळू शकतो. यामुळे तुमच्या स्मार्टफोनची एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम ऑप्टिमाईज होईल. हे फीचर्स टीएआरई (TARE) म्हणजेच 'अँड्रॉइड रिसोर्स इकॉनॉमी' असण्याचं अपेक्षित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Technology