मुंबई, 7 जुलै- आजकाल व्हॉट्सअॅप (WhatsApp) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल आहे. ऑफिसची बरीच कामं व्हॉट्सअॅपवरून होतात. तसंच मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअॅप महत्त्वाची भूमिका बजावतंय; मात्र कधी तरी एखाद्या गोष्टीवरून भांडण झालं किंवा मतभेद झाले, की लोक व्हॉट्सअॅपवर एकमेकांना ब्लॉक (Block) करतात. ब्लॉक केलंय हे फक्त करणाऱ्याला कळतं. ज्याला ब्लॉक केलंय, त्याला याबाबत कळत नाही. तसंच नोटिफिकेशनदेखील येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कुणी तरी ब्लॉक केलंय हे माहीतच होत नाही. आपण मेसेज (messages) करतो आणि रिप्लायची वाट पाहत असतो. आपल्याला कोणी ब्लॉक केलंय का, याबद्दल माहिती करून घेण्यासाठीच्या काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ब्लॉक केलं असेल तर प्रोफाइल पिक्चर दिसणार नाही
कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं असेल, तर तुम्हाला त्यांचं प्रोफाइल पिक्चर (profile picture) दिसत नाही. तुम्ही चॅटिंग बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला जुना फोटो दिसत असेल आणि नंतर तोही दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक केलंय, हे लक्षात घ्या.
ऑनलाइन स्टेटस दिसणार नाही
कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सर्वांचं ऑनलाइन स्टेटस (online status) सर्वांनाच दिसतं. त्यामुळे तुम्हाला कोणीतरी ब्लॉक केलंय ही शंका असेल तर त्यांचं स्टेटस बघा. तुम्हाला ब्लॉक केलं गेलं असेल, तर तुम्हाला ऑनलाइन स्टेटस दिसणार नाही.
(हे वाचा:App असली आहे की नकली कसं ओळखाल? या गोष्टी तपासा, नुकसानापासून होईल बचाव)
व्हॉट्सअॅप कॉलचं उत्तर मिळणार नाही
हादेखील एक सोपा पर्याय आहे. तुम्हाला कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं असेल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअॅपवर फोन लावल्यानंतर तो रिसीव्ह होणार नाही. तुम्हाला रिंगटोन ऐकू येईल; मात्र समोरची व्यक्ती फोन उचलणार नाही.
(हे वाचा: सावधान! चुकूनही Credit Card ने करू नका या गोष्टींसाठी Payment, अन्यथा...)
मेसेज पाठवल्यानंतर डबल टिक आणि ब्लू टिक दिसणार नाही -
आपण व्हॉट्सअॅपवर कोणालाही मेसेज केला, की आपल्याला मेसेज डिलिव्हर झाल्यानंतर डबल टिक दिसते आणि मेसेज पाहिल्यानंतर ब्लू टिक दिसते; मात्र तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला मेसेज पाठवल्यानंतर सिंगल टिकमार्क दिसेल.
व्हॉट्सअॅप ग्रुप क्रिएट करा
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर ग्रुप क्रिएट केल्यास तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय का, हे लगेच कळेल. तुम्ही ग्रुप तयार करत असाल, तर ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलंय अशी तुम्हाला शंका आहे, त्या व्यक्तीला अॅड करा. त्या व्यक्तीला अॅड करताना 'Couldn't Add This Contact On Group' असा मेसेज दिसला तर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलंय, हे निश्चित आहे.
याशिवाय तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअॅपवरील स्टेटस किंवा इतर अॅक्टिव्हिटीज दिसणार नाही, हीदेखील ब्लॉक केलं असल्याची खूण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.