Home /News /technology /

सावधान! तब्बल 337 अॅप्समध्ये आहे धोकादायक व्हायरस, संपूर्ण डेटा चोरी होण्याची शक्यता

सावधान! तब्बल 337 अॅप्समध्ये आहे धोकादायक व्हायरस, संपूर्ण डेटा चोरी होण्याची शक्यता

या मेलवेयरमध्ये बँकिंग आणि वापरकर्त्याचा अन्य गोपनीय डेटा चोरण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा धोकादायक असल्याचं सायबर सिक्यूरिटीनं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 31 जुलै : देशाच्या सायबर सिक्युरिटी एजन्सी 'ब्लॅकरॉक' (BlackRock) ने अँड्रॉइड मेलवेयर विरोधात एक चेतावणी जारी केली आहे. या मेलवेयरमध्ये बँकिंग आणि वापरकर्त्याचा अन्य गोपनीय डेटा चोरण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा धोकादायक असल्याचं सायबर सिक्यूरिटीनं म्हटलं आहे. भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघाने (सीईआरटी-इन) यासंबंधी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, मेलवेअर, ईमेल, ई-कॉमर्स अ‍ॅप्स, सोशल मीडिया अ‍ॅप्स व्यतिरिक्त 300 हून अधिक अ‍ॅप्सवरून पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड-संवेदनशील माहिती चोरू शकतात. ही 'ट्रोजन' प्रकारातील व्हायरस हल्ला असून जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं भारतीय माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत माहिती तंत्रज्ञान सुरक्षा संस्था सीईआरटी-इनने जारी केलेल्या सल्ल्यामध्ये म्हटलं आहे. या वर्षी BlackRock मेलवेयरशी संबंधित एका रिपोर्ट ThreatFabric ने या महिन्यात जारी केला होता. त्यावेळी सुद्धा या मेलवेयरशी संबंधीत माहिती देण्यात आली होती. या दोन स्मार्टफोनवर आज आहे मोठा सेल, flipkartवर बंपर ऑफरला सुरुवात मिळालेल्या माहितीनुसार, हे मेलवेअर इतर बँकिंग ट्रोजनांप्रमाणेच काम करतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे तो शक्य तितक्या अॅप्सना लक्ष्य करू शकतो. यामुळे वापरकर्त्यांची लॉगिन प्रमाणपत्रं (यूजरनेम और पासवर्ड) च चोरी करीत नाही तर त्यांना कार्ड पेमेंट माहिती देण्यासाठी सुद्धा भाग पाडतात. BlackRock मेलवेयर प्रकरण या वर्षाच्या मेमध्ये उघडकीस आलं होतं. हॅकर्स 337 अॅप्सद्वारे वापरकर्त्यांना टार्गेट करत आहेत, ज्यामध्ये हे मेलवेअर अस्तित्वात आहे. त्यामुळे यामुळे वापरकर्त्यांना मोठा धोका आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Tech news

    पुढील बातम्या