मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Skype वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! नवं फीचर दाखर; गर्दीतूनही करू शकाल व्यवस्थित कॉल

Skype वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! नवं फीचर दाखर; गर्दीतूनही करू शकाल व्यवस्थित कॉल

Skype new feature noise cancellation: स्काइप युजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. Work from Home च्या काळात युजर्सना या उपयुक्त फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.

Skype new feature noise cancellation: स्काइप युजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. Work from Home च्या काळात युजर्सना या उपयुक्त फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.

Skype new feature noise cancellation: स्काइप युजर्ससाठी एक नवं फीचर आणलं आहे. Work from Home च्या काळात युजर्सना या उपयुक्त फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती.

    नवी दिल्ली, 16 मार्च: स्काइप युजर्ससाठी (Skype Users) एक आनंदाची बातमी आहे. स्काईप युजर्सना ज्या फीचर्सची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती अशी महत्त्वाची फीचर्स आता स्काईपनं आणली आहेत. यात सर्वांत महत्त्वाचं फिचर आहे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (Active Noise Cancellation new Skype feature). यामुळं आता व्हिडिओ (Video) किंवा व्हॉइस कॉलच्या (Voice calls) दरम्यान येणारे बाहेरचे आवाज कमी होतील आणि कॉलर्सचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतील. आता अगदी गर्दीच्या ठिकाणीही युजर्स व्हिडिओ चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतील.

    आजूबाजूला असणाऱ्या आवाजांमध्येही फोनवरच्या व्यक्तीला आपलं बोलणं स्पष्टपणे ऐकू येईल. आता दोन्ही बाजूच्या स्पीकर्सना बाकीचे आवाज ऐकू येणार नाहीत आणि त्यासाठी स्पीकरचा आवाज वाढवण्याचीही गरज नाही. नॉइज कॅन्सलेशनची ही सुविधा फक्त विंडोज आणि मॅकसाठी डेस्कटॉपवर उपलब्ध असेल.

    मायक्रोसॉफ्टनं विंडोज डेस्कटॉपवर स्काईपचं 8.0.76.48 व्हर्जन वापरलं असून, त्यात या फिचरसह अनेक नवीन फीचर्स दिसत आहेत. यामध्ये प्रथमच नॉइज कॅन्सलेशन फिचर दिसत आहे. तसंच यामध्ये डब्ल्यूएएम सपोर्टही आहे. याच्या मदतीनं स्काईपवर वारंवार पासवर्ड टाकण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. अनेक अकाऊंटसही स्वीच करता येणार आहेत. त्यासह आता स्काईपमध्ये उच्च दर्जाची प्रायव्हसी कॅटॅगरीही उपलब्ध होणार आहे.

    150 पेक्षा अधिक आवाज कमी होणार : अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर अंतर्गत 150 प्रकारचे आवाज कमी करण्यात आले आहेत. दोन लोकांच्या बोलण्यात व्यत्यय आणणारे कीबोर्ड टायपिंग, पळणे, चालणे, कुत्र्याचे भुंकणे, पेपरचा आवाज, खाण्याचा आवाज असे अनेक लहानसहान आवाज आता ऐकू येणार नाहीत.

    (हे वाचा:खूशखबर : मोबाइल नंबर बदलला तरी नवीन नंबरवर जुने व्हॉट्सअ‍ॅप चॅट होणार उपलब्ध)

    ही फीचर्स लवकरच येणार : येत्या काही दिवसांत स्काईप आणखीही काही नवीन फीचर्स आणणार आहे. यामध्ये सफारी स्काईप सपोर्ट, क्रोमियम बेस्ड ब्राउजर्सवर स्काईप सपोर्ट, मीटिंग लॉक करण्याची सुविधा, बॅकग्राउंड ब्लर सपोर्टसह फोन नंबरवरून युजर्सचा शोध घेण्याच्या फिचरचाही समावेश आहे.

    अॅक्टीव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचर असे सुरू करा :

    - डेस्कटॉपवर स्काईप अकाऊंट लॉग-इन करा.

    - प्रोफाईलवर जाऊन सेटिंग्जवर क्लिक करा. त्यात ऑडीओ-व्हिडिओ ऑप्शन दिसेल.

    - ऑडीओवर जा

    - इथं  नॉइज अ‍ॅक्टिव्ह कॅन्सलेशन सिलेक्ट करा.

    - ऑटो, लो, हाय ऑप्शन निवडा.

    First published:
    top videos

      Tags: Technology