Home /News /technology /

Facebookने कपल्ससाठी आणलं नवं फीचर; आता डेटसोबत करू शकाल हीसुद्धा गोष्ट

Facebookने कपल्ससाठी आणलं नवं फीचर; आता डेटसोबत करू शकाल हीसुद्धा गोष्ट

File Photo

File Photo

फेसबुक डेटिंग अॅपमध्ये नवे फिचर समाविष्ट करत आहे. त्याचबरोबर लकी पिक हे नवे फिचरही सादर करणार आहे.

मुंबई, 12 ऑगस्ट: सोशल मीडियावरील ( Social Media) फेसबुक (Facebook) हे सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. आज जगातील कोटयवधी लोक फेसबुकचा वापर करतात. वैयक्तिक आयुष्यातील एखादी गोष्ट शेअर करण्यासाठी, मत व्यक्त करण्यासाठी, व्हिडीओ, फोटोज शेअर करण्यासाठी, व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी किंवा मित्र-मैत्रिणींसोबत मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग, मिटींग करण्यासाठी फेसबुकचा प्राधान्यानं वापर केला जातो. काही लोक फेसबुकचा वापर डेटिंगसाठी (Dating) देखील करतात. डेटिंगसाठी फेसबुक वापरणाऱ्यांकरिता ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. व्हर्च्युअल डेटिंग (Virtual Dating) अधिक मनोरंजक आणि रोचक व्हावं यासाठी फेसबुक एक नवं फिचर (Feature) सादर करणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने डेटिंग अॅपमध्ये ऑडियो डेटससह (Audio Dates) आणखी काही नवी फिचर्स समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच लकी पिक नावाचं एक नवं फिचर देखील कंपनी सादर करणार आहे. जाणून घेऊया ही नवी फिचर्स कशी आहेत, ती कसं काम करतील याविषयी... फेसबुक डेटिंग अॅपमध्ये नवे फिचर समाविष्ट करत आहे. त्याचबरोबर लकी पिक हे नवे फिचरही सादर करणार आहे. ऑडियो डेटस हे नव्या फिचर्समधील सर्वात मोठे आणि महत्वाचे असे फिचर आहे. हे फिचर युजरला अनुरुप अशा व्यक्तीशी ऑडिओ संभाषण सुरु करण्यास अनुमती देईल, असं द व्हर्जने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. (हे वाचा:कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना?असं तपासून करा हे सुरक्षित बदल  ) फेसबुक मॅच एनीव्हेअर हे फिचर असं सांगतं की तात्पुरत्या स्वरुपात काम करणाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी रहात असलेल्या किंवा त्यांच्यासोबत प्रवास करत असलेल्या लोकांशी जोडणं सुलभ झालं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर ऑडियो डेटसोबतच फेसबुक लकी पिक नावाचे एक नवे फिचर देखील सादर करणार आहे. हे फिचर डेटर्सना त्यांच्याशी सुसंगत परंतु, विशिष्ट आवडीच्या कक्षेत नसलेल्या उमेदवाराविषयी विचार करण्यासाठी चालना देईल. या पूर्वीच्या अहवालानुसार, फ्री-टू-यूज अॅप हे कोणतेही सार्वजनिक प्रोफाईल,स्वाइपिंग किंवा थेट मेसेजिंग ( Messaging) नसून एक साधारण व्हिडीओ स्पीड चॅट ऑफर करणार आहे. (हे वाचा:WhatsApp वर चॅटिंग करायला आता आणखी धमाल! लवकरच येणार हे नवीन फिचर ) एका अहवालानुसार, ऑडियो डेटसमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत कॉलिंग सुरु करण्यासाठी प्रयत्न कराल, तेव्हा समोरील व्यक्तीला तुमचे यासाठी आमंत्रण मिळेल. त्याने जर हे आमंत्रण स्वीकारलं तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत चॅट करु शकाल. फेसबुक युजर्सला फेसबुक डेटिंगमध्ये दोन अतिरिक्त पर्याय सेट करण्याची अनुमती देत असून, जेथे तुम्ही तुम्हाला मॅच होणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ शकता.
First published:

Tags: Facebook, Social media

पुढील बातम्या