Home /News /technology /

फारच स्वस्तात मिळत आहे 6GB RAM चा Redmi फोन; मिळेल 33W चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी

फारच स्वस्तात मिळत आहे 6GB RAM चा Redmi फोन; मिळेल 33W चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी

अॅमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड सेलचा आज (20 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. हा सेल 16 नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून, त्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक बेस्ट डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्हालाही नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा अपग्रेड सेल ही चांगली संधी आहे

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 नोव्हेंबर-  अॅमेझॉन स्मार्टफोन अपग्रेड सेलचा आज (20 नोव्हेंबर) शेवटचा दिवस आहे. हा सेल 16 नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून, त्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक बेस्ट डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. तुम्हालाही नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा अपग्रेड सेल ही चांगली संधी आहे. त्यात या सेलबाबतची एक खूशखबरही आहे. शाओमीचा Redmi Note 10S हा फोन या सेलमध्ये बेस्ट डीलवर उपलब्ध केला जात आहे. या फोनची स्पेसिफिकेशन्स आणि त्यावर मिळणाऱ्या ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या. Redmi Note 10S या फोनच्या बेस व्हॅरिएंटची स्पेसिफिकेशन्स 6GB RAM + 64GB स्टोअरेज अशी असून, त्याची किंमत 14,999 रुपये आहे. 6GB RAM + 128GB स्टोअरेज क्षमता असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 16,499 रुपये हैआहे. Amazon Sale मध्ये या स्मार्टफोनवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट ICICI Bank आणि Citibank च्या कार्ड्सवर दिला जात आहे. त्याशिवाय या फोनवर एक्स्चेंज ऑफर आणि EMIचा ऑप्शनही दिला जात आहे. Redmi Note 10S या फोनला 6.43 इंच आकाराचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचं स्क्रीन रिझॉल्युशन 1080×2400 पिक्सेल्स आहे. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे. हा फोन MIUI 12.5 वर आधारित अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या फोनला 2.05 गीगाहर्ट्ज मीडियाटेक हेलिओ G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यात ARM Mali-G76 MC4 जीपीयू आहे. रेडमी नोट 10S या फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेलची डेप्थ सेन्सर यांचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या नव्या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.पॉवरसाठी या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सिक्युरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे 6GB RAM + 64GB स्टोअरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोअरेज अशा दोन व्हॅरिएंट्समध्ये फोन उपलब्ध आहे.
    First published:

    Tags: Smartphone, Technology

    पुढील बातम्या