Home /News /technology /

'Amazon' वर जबरदस्त सेल; इतक्या कमी किंमतीत मिळणार स्मार्टफोन

'Amazon' वर जबरदस्त सेल; इतक्या कमी किंमतीत मिळणार स्मार्टफोन

Amazon

Amazon

सध्या नाताळच्या सणानिमित्त सगळीकडे खरेदीचा उत्साह जाणवत असून, सेलची रेलचेल दिसत आहे. ई-कॉमर्स कंपन्यानीही ऑनलाइन सेलचे आयोजन केले असून, ग्राहकही त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत.

    मुंबई, 18 डिसेंबर-   सध्या नाताळच्या सणानिमित्त सगळीकडे खरेदीचा उत्साह जाणवत असून, सेलची रेलचेल दिसत आहे. ई-कॉमर्स कंपन्यानीही ऑनलाइन सेलचे आयोजन केले असून, ग्राहकही त्याचा पुरेपूर लाभ घेत आहेत. या सेलमध्ये कपडे, इलेक्ट्रोनिक वस्तूंसह मोबाइल हँडसेटसना सर्वाधिक मागणी असते. ई-कॉमर्स कंपन्यापैकी सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अॅमेझॉननं सध्या "मोबाइल सेव्हिंग डेज सेल'चे  (Amazon Mobile Savings Days)  आयोजन केलं असून, हा सेल 22 डिसेंबर 21पर्यंत चालणार आहे. यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत असून, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय  (EMI)  सह अनेक आकर्षक सवलतींचाही लाभ मिळत आहे. तसंच वन कार्ड  (OneCard)  क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास 10 टक्के सवलत देण्यात येत आहे. या सेलमध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे लोकप्रिय स्मार्टफोन्स ग्राहकांना अत्यंत सवलतीच्या किमतीत मिळत आहेत. त्यामुळे मोबाइल प्रेमींचा सणासुदीसाठीच्या खरेदीचा आनंद द्विगुणीत होत आहे. आजतकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रेड मी 9 ए (Redmi 9A): या सेलमध्ये रेड मी 9 ए (Redmi 9A)हा स्मार्टफोन घसघशीत डिस्काउंटसह विकला जात असून, तो फक्त 6 हजार 999 रुपयांपासून उपलब्ध आहे. यात MediaTek Helio G25 ऑक्टा कोअर प्रोसेसर वापरला असून या फोनमध्ये13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. वन प्लस 9 फाईव्ह जी ( OnePlus 9 5G) : या सेलमध्ये वन प्लस 9 फाईव्ह जी स्मार्टफोनवर (OnePlus 9 5G) बंपर डिस्काउंट मिळत आहे. कंपनीने या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवली असून त्याव्यतिरीक्तही अनेक सवलती दिल्या जात आहेत. या फोनवर 5 हजारची सूट मिळत आहे, तसंच आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank)क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 8 हजारांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. iQoo Z5 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778 5G (Qualcomm Snapdragon 778 5G) प्रोसेसर असलेला iQooZ5 5G हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या 23 हजार 990 रुपयांना मिळत असून, त्यावर ३ हजार रुपयांची कूपन सूटदेखील देण्यात येत आहे. सॅमसंग गॅलक्सी एम -12 (Samsung Galaxy M12): सॅमसंगचा परवडणाऱ्या किमतीतील गॅलक्सी एम -12 (SamsungGalaxyM12) हा स्मार्टफोन अवघ्या 11हजार 499 रुपयांपासून मिळत असून, त्यावर 1 हजार रुपयांची कूपन सूटदेखील दिली जात आहे. या फोनमध्ये 6000mAhची मोठी बॅटरी आहे.
    First published:

    Tags: Amazon, Smart phone

    पुढील बातम्या