• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • OMG! 19 हजारांच्या स्मार्टफोनवर आठ हजारांचा डिस्काउंट! वाचा, काय आहे ऑफर?

OMG! 19 हजारांच्या स्मार्टफोनवर आठ हजारांचा डिस्काउंट! वाचा, काय आहे ऑफर?

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत आहात का? मग तुमच्यासाठी एक अत्यंत आकर्षक संधी आहे. Poco X3 Pro हा स्मार्टफोन (Smartphone) अलीकडेच लाँच झाला असून, त्याची किंमत 18 हजार 999 रुपये आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 3 एप्रिल: तुम्ही स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत आहात का? मग तुमच्यासाठी एक अत्यंत आकर्षक संधी आहे. Poco X3 Pro हा स्मार्टफोन (Smartphone) अलीकडेच लाँच झाला असून, त्याची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. कंपनीने सवलतीची एक ऑफर सादर केली असून, त्यात आठ हजारांची सवलत मिळू शकेल. त्याव्यतिरिक्त ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहार केला, तर 1000 रुपयांची अतिरिक्त सवलतही मिळत आहे. ऑफर नेमकी काय आहे? या ऑफरअंतर्गत, Poco F1 असलेल्या ग्राहकांना त्यांचा फोन अपग्रेड करून Poco X3 Pro हा फोन घेता येणार आहे. त्यासाठी केवळ 10 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत (Exchange Offer) ही सवलत मिळणार आहे. या एक्स्चेंज योजनेअंतर्गत Poco X3 Pro या स्मार्टफोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 11 हजार 999 रुपये, तर 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये असेल. तसंच दोन्ही व्हॅरिएंट्सवर ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 1000 रुपयांचा अतिरिक्त इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हे फोन अधिकच स्वस्तात मिळतात. स्मार्टफोनची वैशिष्ट्ये Poco X3 Pro स्मार्टफोनला 6.7 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, टच रिस्पॉन्स 240Hz आहे, तर ब्राइटनेस 45 nits आहे. त्याला गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शनही आहे. या स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याची रॅम 8GBपर्यंत असून, 128GB स्टोरेज क्षमता आहे. फोनला 5160mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, 33W चार्जिंगची सोय आहे. या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्यातली मुख्य लेन्स 48MP क्षमतेची आहे. त्याशिवाय 8MP क्षमतेची सेकंडरी लेन्स आणि 2MP क्षमतेच्या दोन लेन्सेस असे एकूण चार कॅमेरे आहेत. फ्रंट कॅमेरा 20MP क्षमतेचा आहे. (हे वाचा:   नवीन मोबाईल घ्यायचाय? हे आहेत 6 हजार रुपयांच्या आतले बजेट स्मार्टफोन ) एकंदरीत सांगायचं झालं, तर फीचर्सच्या दृष्टीने Poco X3 Pro हा स्मार्टफोन तगडा आहे. क्वाड कॅमेऱ्यामुळे त्यावरील फोटो चांगल्या दर्जाचे असतील, तसंच प्रोसेसर आणि रॅमही तगडी असल्याने त्याचा परफॉर्मन्सही उत्तम असेल. उत्तम वैशिष्ट्यांचा फोन चांगल्या ऑफरमध्ये मिळणं हे दुर्मिळ असतं त्यामुळे तुम्ही जर नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
First published: