Elec-widget

108 MP कॅमेरा सेंसर आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग फिचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S11

108 MP कॅमेरा सेंसर आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग फिचर्ससह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S11

Samsung कंपनी S10 नंतर पुढची सिरीज काढण्याच्या तयारीत आहे. दमदार कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि दणदणीत फिचर्स या मोबाईलमध्ये असू शकतात.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर: सॅमसंग लवकरच एस 10 नंतर आता एस 11 मोबाईलचं मॉडेल लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कॅमेरा आणि फोकस यासाठी या मॉडेलची चर्चा होत आहे. या मोबाईलमध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि 108 MP कॅमेरा ग्राहकांना मिळू शकतो. Director's View, Night Hyperlapse, Single Take Photo, Vertical Panorama आणि custom filters यासारखे मोड्स कॅमेऱ्यामध्ये उपलब्ध असतील.

मजबूत प्रोसेसर

सॅमसंगचे फोन जेवढे फिचर्सने फेमस आहेत त्यापेक्षा हँक होण्यासाठी जास्त प्रसिद्ध होत असताना स्पर्धेत टिकण्यासाठी सॅमसंग आता अधिक चांगल्या प्रोसेसरवर काम करत आहे. एम आणि ए सिरीजच्या यशानंतर आता सॅमसंग S11 मोबाईलमध्ये चांगला प्रोसेसर देण्यात येणार आहे. 108-मेगापिक्सल रिझोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशो डिस्प्ले दिला जाणार आहे. Samsung Exynos 990 (मोबाइल प्रोसेसर)SoCमध्येही 8K@30fps video decoding/encoding कपॅसिटीचा सपोर्ट मिळू शकतो. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी प्रोसेसर मजबूत असणं आवश्यक आहे.

कॅमेरा फिचर्स

Samsung Galaxy S11 मोबाईलमध्ये डायरेक्ट व्ह्यूच्या मदतीनं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. नाइट हाइपरलॅप्स मोड फोन स्थिर ठेवण्यासाठी सतत अलर्ट करत राहिल. तुमचा हात किंवा फोन अँगलपासून हलला तर तो अलर्ट देत राहिलं. 15 सेकंदाचे पॅन शॉर्ट व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता.

Loading...

फेब्रुवारी 2020मध्ये तिसऱ्या आठवड्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका इव्हेंटदरम्यान ह्या मोबाईलचं लाँचिंग केलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...