मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /व्हॉट्सॲपवर क्विक नोट्स सुरू करायचंय? सोपं आहे; ही पद्धत करा फॉलो!

व्हॉट्सॲपवर क्विक नोट्स सुरू करायचंय? सोपं आहे; ही पद्धत करा फॉलो!

काही अँड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) स्मार्टफोन्समध्ये रिमांडर अॅप्स प्री–इन्स्टॉल (Pre-Install) असतात. परंतु, याबाबत आपल्याला माहिती नसते किंवा आपण हे अॅप्स वापरत नाही.

काही अँड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) स्मार्टफोन्समध्ये रिमांडर अॅप्स प्री–इन्स्टॉल (Pre-Install) असतात. परंतु, याबाबत आपल्याला माहिती नसते किंवा आपण हे अॅप्स वापरत नाही.

काही अँड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) स्मार्टफोन्समध्ये रिमांडर अॅप्स प्री–इन्स्टॉल (Pre-Install) असतात. परंतु, याबाबत आपल्याला माहिती नसते किंवा आपण हे अॅप्स वापरत नाही.

नवी दिल्ली, 2 मार्च:  काही अँड्रॉइड (Android) किंवा आयओएस (iOS) स्मार्टफोन्समध्ये रिमांडर अॅप्स प्री–इन्स्टॉल (Pre-Install) असतात. परंतु, याबाबत आपल्याला माहिती नसते किंवा आपण हे अॅप्स वापरत नाही. त्यामुळे क्विक नोट्ससाठी (Quick Notes) किंवा महत्वाच्या लिंक सेव्ह करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्सकडे वळतो. व्हॉट्सॲप (WhatsApp) हा बऱ्याच वर्षांपासून इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरला जाणारा अॅप एक प्लॅटफॉर्म म्हणून आपल्या अॅण्ड्राईड किंवा आयओएस फोनमध्ये आहे. जर तुम्ही क्विक नोट्स घेण्यासाठी व्हॉट्सॲपवर सेल्फ मेसेजिंग फिचर सुरू करायचे असेल तर त्यासाठी काही सोपे उपाय आहेत. त्याविषयी जाणून घेऊया...

सेल्फ चॅट किंवा सेल्फ मेसेज फिचर व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यातील पहिल्या प्रकारात तुम्हाला वेब ब्राऊजर वापरून wa.me// ही युआरएल तुमच्या 10 अंकी मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोधावी लागेल. भारतातील युझर्सला 10 अंकी मोबाईल क्रमाकांच्या सुरुवातील 91 हा क्रमांक अॅड करावा लागेल. त्यानंतर ही लिंक wa.me//91xxxxxxxxxx अशी दिसेल. ही युआरएल (URL) कोणत्याही वेब ब्राऊझरवर रन झाल्यानंतर तुम्हाला नवीन वेबपेज दिसेल आणि त्यावर Chat on WhatsApp with +91 (Your 10 digit Mobil Number) असं लिहिलेलं दिसेल. यानंतर युझर्सला Continue to chat हा पर्याय निवडावा लागेल. त्यात पुन्हा दोन पर्याय असतील. जर तुम्ही डेस्कटॉप वेब ब्राउझर वापरत असाल तर व्हॉटस वेब ब्राऊझरची लिंक डाऊनलोड करावी लागेल. तसेच तुम्ही व्हॉट्सॲप डेस्कटॉप (WhatsApp Desktop) किंवा व्हॉट्सॲप फॉर अँड्रॉइड किंवा आयओएस या लिंक्सही तुमच्या सिस्टीमनुसार शोधू शकता. तसेच व्हॉट्सॲप वेब (WhatsApp Web) यावर क्लिक करण्याचा देखील पर्याय निवडू शकता. तुम्ही सेल्फ चॅट सुरु केल्यावर महत्वाचे कॉन्टॅक्ट नावाप्रमाणे सेव्ह करु शकता, यामुळे वेळेला तुम्हाला हवा असलेला क्रमांक सहजपणे शोधता येतो. सेल्फ चॅट हे फिचर तुम्हाला व्हॉट्सॲप अॅप्स किंवा वेब क्लायेंटव्दारेच वापरता येतं.

(हे पाहा: यूजर्ससाठी खुशखबर! WhatsAppचं नवं फीचर, व्हिडीओ पाठवणाऱ्यांसाठी आहे खास )

जर ही पध्दत वापरताना व्हॉट्सॲप युझर्सला अडचणी आल्या तर पारंपरिक पध्दतीचा देखील वापर करता येतो. पण ही पध्दत जरा वेळखाऊ आहे. या पध्दतीमध्ये व्हॉट्सॲप युझरला मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींचा एक ग्रुप तयार करावा लागेल. दोन सदस्यांसह (स्वतःसह) हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाऊ शकतो. एकदा ग्रुप तयार झाला की तुम्ही अन्य सभासद काढून टाकू शकता आणि सर्व चॅट स्वतःकडे ठेवू शकता. तसेच या पध्दतीमुळे फेसबुकमधील मेसेजिंग अॅपवरील (Facebook Messaging App) सेल्फ चॅट फिचरचा वापर करता येतो.

First published:

Tags: Technology, Whatsapp