नवी दिल्ली, 6 मार्च: डेस्कटॉप ॲपसाठी (Desktop App) व्हॉट्सॲपने (WhatsApp) आता व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग (Voice and Video Calling for web whatsapp) ही फीचर्स आणली आहेत. या इन्स्टंट मेसेजिंग ॲपने याबाबत Tweet करून माहिती दिली आहे. परंतु प्रत्यक्षात डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरून whatsapp वापरताना ही फीचर कधी वापरता येणार याबबात अद्याप कुठलाही उल्लेख कंपनीने केलेला नाही.
फेसबुकच्या (Facebook) मालकीचा फ्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपने असा दावा केलाय की फोन ॲप्सवरील व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग प्रमाणेच डेस्कटॉप ॲपला देखील सुरक्षिततेसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (End-To-End Encryption) करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲप कॉलिंगचे हे नवे फिचर झूम किंवा गुगल मीट व्हिडीओ कॉन्फरन्सिंग फ्लॅटफॉर्मशी थेट स्पर्धा करणारं नसलं तरी युझर्ससाठी हा अतिरिक्त पर्याय नक्कीच ठरू शकेल.
व्हॉट्सॲप डेस्कटॉप ॲपवरील व्हिडीओ कॉलिंग फिचर हे पोर्ट्रेट (Portrait) आणि लँडस्केप (Landscape) अशा दोन्ही अँगल्सला सपोर्ट करेल, असे व्हॉट्सॲपने एका निवेदनाव्दारे स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ संगणकाच्या स्क्रिनवरील आकार बदलू शकणाऱ्या स्टँडअलोन विंडोमध्ये दिसू शकेल, तसेच ही विंडो स्क्रिनवर टॉपवर ठेवल्यास युझर्सला चॅटींगदेखील सुरु ठेवता येईल. नमूद केल्याप्रमाणं व्हॉट्सॲप डेस्कटॉपवरील व्हॉईस कॉलिंग हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल, म्हणजेत व्हॉट्सॲपवरुन डेटा स्नूपिंग टाळण्यासाठी एन्क्रिप्टेड स्वरुपात एका डिव्हाईसमधून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये जाईल.
हे नवं व्हिडीओ कॉलिंग फिचर वापरण्यासाठी युझरच्या मोबाईलवर आधीपासूनच व्हॉट्सॲप सुरु असावे, तसेच युझरला त्याच्या मॅक किंवा पीसीवर व्हॉट्सॲप डेस्कटॉप ॲप इन्स्टॉल करावं लागेल. डेस्कटॉप ॲप (व्हॉट्सॲप वेबासाईटवरुन) इन्स्टॉल केल्यानंतर युझर्स क्यूआर कोड स्कॅनकरुन (QR Code Scan) हे फिचर वापरू शकेल.
सध्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग केवळ वन-टू-वन चॅटींगसाठी उपलब्ध आहे. लवकरच ते ग्रुप चॅटसाठी उपलब्ध होणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस वरील व्हॉट्सॲप आठ जणांच्या ग्रुप चॅटवर सिंगल व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल्स करता सपोर्ट करेल.
(हे पाहा:एलॉन मस्क यांच्या Starlink इंटरनेटसाठी भारतात बुकिंग सुरू; पाहा किती आहे चार्ज )
व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगचे आयकॉन्स यापूर्वीच व्हॉट्सॲप वेबवर दिसू लागले असले तरी हे फिचर्स अजून विकसित होण्याच्या प्रक्रियेतच आहेत. याचे स्टेबल व्हर्जन या महिन्यात आणले जाईल, असं व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे. व्हॉट्सॲपनं यापूर्वी जाहिर केलं होतं की या ॲप्सवरून (अँड्रॉइड आणि आयएसओसाठी) मागील सर्व रेकॉर्ड मोडत मागील वर्षाच्या आदल्या दिवशी 1.4 अब्ज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले होते. कोविड-19 महामारीमुळे (Covid-19 Pandemic) बहुतांश लोकांना घरातच राहवे लागल्याने केवळ व्हॉट्सॲपवरच नव्हे तर अन्य अॅप्सव्दारे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्स करण्याचे प्रमाण वाढले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp features