Home /News /technology /

कॉर्निंगचा भारतीय नवकल्पनांवर विश्वास, दिल्लीतील युथ फेस्टिव्हलचे खास आकर्षण

कॉर्निंगचा भारतीय नवकल्पनांवर विश्वास, दिल्लीतील युथ फेस्टिव्हलचे खास आकर्षण

चांगल्या संधीचा मागोवा घेणे व सातत्याने नावीन्यपूर्ण असे काही कस्टमरसमोर सादर करणे हे गोरिला ग्लासचे निर्माते यू.एस. स्थित कॉर्निंगचे काम असून उत्कृष्ट भारतीय स्मार्टफोन संधीसाठी एक चांगले व्हिजन त्यांच्याकडे आहे.

    मागील काही वर्षांचा मोबाईल फोनसंबंधीचा जर आपण एक आढावा घेतला तर असे लक्षात येते की भारतात मोबाईल फोनसारखा दुसरा व्यवसाय नाही. गेल्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन युजरची आकडेवारी पाहता प्रत्येक वर्षाला युजरची वाढणारी संख्या लक्षणीय आहे आणि ज्यामुळेच भारत ही जगातील क्रमांक दोनची बाजारपेठ बनली आहे. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध सर्व डिव्हाईस पाहिले तर त्या सर्वांच्या फीचर्समध्ये एक कॉमन गोष्ट दिसून येते ती म्हणजे कॉर्निंगची गोरिला ग्लास. फोन वापरताना येणारे स्क्रॅच आणि बम्प्सपासून रक्षण करण्यासाठी मुख्यतः या ग्लासचा वापर होत आहे. खरं तर, ही ग्लास सध्या खूपच लोकप्रिय असून कॉर्निंगचा असा दावा आहे की सुमारे सात दशलक्षहून अधिक डिव्हाईससाठी या ग्लासची निर्मिती करण्यात आली आहे व ते या सेगमेंटमधील निर्विवादपणे अनभिषक्त सम्राट आहेत. आणि त्यामुळेच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताकडे आकर्षिले जाणे साहजिकच आहे, जेथील सध्याची जनरेशन टेक सेव्ही असून नवकल्पनांचा आविष्कार करणे व त्या आत्मसात करणे याकडे त्यांचा कल दिसून येतो. जगभरातील देशांचा विकासाचा आलेख पाहिला तर भारत देशासारखी प्रगती, विकास करणारा देश अन्य कोणताही नाही आणि यामुळेच स्मार्टफोन बिझनेस करणारा प्रत्येकजण येथे प्रमुख अग्रगण्य बनतो आहे. भारतात 400 दशलक्षपेक्षा अधिक व्यक्तींकडे स्मार्टफोन्स आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. चांगल्या संधीचा मागोवा घेणे व सातत्याने नावीन्यपूर्ण असे काही कस्टमरसमोर सादर करणे हे गोरिला ग्लासचे निर्माते यू.एस. स्थित कॉर्निंगचे काम असून उत्कृष्ट भारतीय स्मार्टफोन संधीसाठी एक चांगले व्हिजन त्यांच्याकडे आहे. या व्हिजनचा एक भाग म्हणजे गोरिला ग्लास प्रोफाईल निर्माण करणे आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सचा टफनेस कस्टमरने अनुभवणे होय. हा विचार नजरेसमोर ठेवत कंपनीने अलीकडेच टेक2 इनोव्हेट (Tech2 Innovate), भारतीय तरुणांकरिता असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या आणि टेक्नॉलॉजी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीमध्ये येत्या 14-15 फेब्रुवारीला होत असलेल्या या इव्हेंटचा मुख्य उद्देश नवचैतन्यास उत्तेजन देणे आणि क्लटर-ब्रेकिंग नावीन्यपूर्ण गोष्टी तयार करणे ज्यांचा परिणाम उद्याच्या जगावर होईल. गॅजेट लव्हर्स, म्युझिक मेकर्स, गेमर्स आणि खूप गोष्टींसाठी असलेल्या या दोन दिवसीय गॅदरिंगचे लीड स्पॉन्सर कॉर्निंग आहे. प्रत्येक ठिकाणी तरुण, कुशल लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यात अगदी बिनधास्त व निर्विवाद राहणे कॉर्निंगने जोपासले आहे. इव्हेंट्चे स्वरुप साधारणतः इंडस्ट्री लीडर्सचे मार्गदर्शन, यूट्यूब स्टार्स, इंस्ट्राग्राम इन्फ्लूएन्सर्स, भारतातील सर्वांत लोकप्रिय टिक टॉकर आणि अनेकांसोबत फायरसाईड चॅट्स, ज्यांनी डिजिटल दुनियेचे हल्लाबोल केला आहे, मिथक दूर केले आहे आणि हाय-ऑक्टेन दोन दिवसांचे पबजी (PUBG ) मोबाईल कॉम्पिटिशन रन केले आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे एक सुवर्णसंधी चालून आली आहे. येथे तुम्ही भेटू शकता कॉर्निंग गोरिला ग्लास बिझनेसचे जनरल मॅनेजर जॉन बेनी आणि कॉर्निंग गोरिला ग्लासचे डिव्हिजन व्हीपी स्कॉट फॉरेस्टर यांना आणि जाणून घेऊ शकता भविष्यकालीन डिव्हाईसबद्दल. संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला तर तुम्ही तुमच्या मनपसंत सोशल मीडिया सेलिब्रेटींना भेटू शकता, त्यांच्यासोबत गप्पा मारू शकता, प्रत्येक तासाला आकर्षक बक्षीस जिंकू शकता आणि खूप काही करू शकता. इव्हेंटमधील तुमची उपस्थिती तुम्हाला मिळवून देऊ शकते भन्नाट स्मार्टफोन्स, कॅमेरा आणि हेडफोन्स कारण येथे तुम्ही अनुभवणार आहात तुमचे कल्चर व ऑटोमेशन, रोबोटिक्सची धम्माल आणि काही टॉप-नॉच मशीन्स. चला तर क्लिक करा (लिंक) आणि आजच तुमची तिकीटे बुक करा!
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या