व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच मिळणार इन्स्टाग्रामवरील 'हे' अत्यंत लोकप्रिय फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच मिळणार इन्स्टाग्रामवरील 'हे' अत्यंत लोकप्रिय फीचर

प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp लवकरच नवकोरं फीचर ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

  • Share this:

प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp लवकरच नवकोरं फीचर ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. इन्स्टाग्रामवर अत्यंत लोकप्रिय असलेलं Boomerang फीचर युजर्ससाठी WhatsAppवरही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप लवकरच iOSवर इन्स्टाग्रामवरील हे प्रसिद्ध फीचर आणण्यासाठी काम करत आहे. WABetaInfoनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच Boomerangचं फीचर उपलब्ध करून देणार आहे. हे फीचर अँड्रॉईड डिव्हाइस वापरणाऱ्या ग्राहकांना हे भन्नाट फीचर वापरता येणार आहे. सध्या बुमरँग फीचर इन्स्टाग्रामवरच उपलब्ध आहे. या फीचरमध्ये व्हिडीओ बॅकवर्ड आणि फॉरवर्डच्या दिशेनं लूप करण्याची सुविधा युजर्संना देण्यात आली आहे. WhatsAppवर उपलब्ध होणाऱ्या या फीचरमध्ये सात सेकंदांचा व्हिडीओ बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लूपमध्ये रेकॉर्ड करता येणार आहे. पण हे फीचर कधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

(वाचा : WhatsAppचं बदललं नाव, तुमच्या फोनमध्ये आता असं दिसणार अ‍ॅप)

आता इंटरनेटशिवाय WhatsApp वापरणं शक्य

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरातून होत असताना त्याचा वापर अधिक सोयीस्कर करण्यासाठी करण्यासाठी एक नवं फीचर येत आहे. दर काही महिन्यांनी या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर फक्त ऑनलाईन चॅटिंग करण्यासाठी राहिला नसून आता या अ‍ॅपच्या मार्फत ऑफिसची अनेक कामं काही मिनिटांत पूर्ण केली जातात. फाइल, डॉक्यूमेंट, लोकेशन, व्हिडीओ आणि इमेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो.

(वाचा : तुमच्या फोनमध्ये मिळवा अनलिमिटेड स्पेस; हा आहे स्मार्ट उपाय!)

अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरही वापरतात. त्याला Whatsapp Web असं म्हणतात. त्यासाठी कॉम्प्युटर वरील स्क्रीनवर येणाऱ्या कोडला फोनच्या व्हॉट्सअ‍ॅपच्यामार्फत स्कॅन केलं जातं. त्यानंतर तुमच्या समोरील स्क्रीनवरही व्हॉट्सअ‍ॅप चालू होतं. मात्र हे वापरत असताना अनेकवेळा ते डिस्कनेक्ट होते. फोन सतत सुरू ठेवावा लागतो.

(वाचा : या 12 प्रकारच्या Emails वर क्लिक केल्याने तुमचं अकाउंट होऊ शकतं हॅक!)

वेब व्हॉटस अ‍ॅपसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनचं इंटरनेट कनेक्शन चालू ठेवावं लागतं. काही तांत्रिक अडचणींवर आता व्हॉट्सअ‍ॅप काम करून लवकरच एक अपडेट आणणार आहे. Whatsapp Webवर येणाऱ्या अपडेटमध्ये फोनचं इंटरनेट बंद असलं तरी ते कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व अपडेटची माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने या नव्या अपडेटची माहिती दिली आहे.

Whatsapp Web साठी हे नवं फीचर येणार आहे. फोनचं इंटरनेट बंद ठेऊनही डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. हे फीचर नक्कीच सर्वांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

अजितदादांनी भरसभेत कार्यकर्त्याला दिलं विधानसभेचं तिकीट, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2019, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading