मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsAppचं बदललं नाव, तुमच्या फोनमध्ये आता असं दिसणार अ‍ॅप

WhatsAppचं बदललं नाव, तुमच्या फोनमध्ये आता असं दिसणार अ‍ॅप

स्टेप 9 – ग्रुप इन्फोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यातील Custom notifications वर क्लिक करा त्यानंतर प्रकिया WhatsApp कॉन्टॅक्ट सारखीच आहे. (संकलन : मेघा जेठे.)

स्टेप 9 – ग्रुप इन्फोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यातील Custom notifications वर क्लिक करा त्यानंतर प्रकिया WhatsApp कॉन्टॅक्ट सारखीच आहे. (संकलन : मेघा जेठे.)

जगभरात प्रसिद्ध असलेले इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्स अ‍ॅपनं (WhatsApp)आपल्या लेटेस्ट बीटा (Latest Beta)व्हर्जनमध्ये युजर्ससाठी एक नवीन अपडेट केलं आहे. या नव्या अपडेटनुसार अ‍ॅपमध्ये 'WhatsApp from Facebook' हा टॅग जोडला गेला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
जगभरात प्रसिद्ध असलेले इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्स अ‍ॅपनं (WhatsApp)आपल्या लेटेस्ट बीटा (Latest Beta)व्हर्जनमध्ये युजर्ससाठी एक नवीन अपडेट केलं आहे. या नव्या अपडेटनुसार अ‍ॅपमध्ये 'WhatsApp from Facebook' हा टॅग जोडला गेला आहे. आठवड्याभरापूर्वीच 'WhatsApp'नं युजर्ससाठी 'फिंगरप्रिंट लॉक फीचर'चा पर्याय उपलब्ध करून दिलं होतं. काही बीटा युजर्संना आपल्या अ‍ॅपमध्ये हे अपडेट झालेलं नाव दिसत आहे. युजर्संकडून WaBetaInfoवर फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये 'WhatsApp from Facebook' टॅग उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2014मध्ये फेसबुकने व्हॉट्स अ‍ॅपची कंपनी विकत घेतली. पण आतापर्यंत अ‍ॅपमध्ये यासंदर्भातील कोणत्याही प्रकारे उल्लेख करण्यात आला नव्हता. कंपनीचं नाव जोडले गेल्यानं व्हॉट्स अ‍ॅप फेसबुकचा अधिकृतरित्या भाग असल्याचं युजर्संना समजलं. (वाचा : फक्त एका क्लिकने वाढवू शकता फोनचा स्पीड, हँग होणार नाही मोबाइल!) फेसबुक कंपनीच्या या रीब्रँडिगचे वृत्त सर्वात आधी The Information या वेबसाइटवर देण्यात आली होती. यानंतर फेसबुकनं स्वतः यास दुजोरा दिला. व्हॉट्स अ‍ॅपआणि इंस्टाग्रामच्या नावात बदल करणार असल्याचं फेसबुकनं स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त फेसबुक इंस्टाग्रामवरही आपली ब्रँडिंग करण्यास तयार आहे. इंस्टाग्रामवर काही युजर्संच्या सेटिंग पेजखाली 'Instagram from Facebook' असं दिसत आहे. (वाचा : WhatsApp आणि Instagramचं नाव बदलणार, ब्रँडिंगसाठी फेसबुकची नवी आयडिया!) काही महिन्यांपूर्वी Whats Appने बिझनेस अ‍ॅप लॉन्च केले होते. बिझनेस अ‍ॅपमुळे Whats App आणखी सुरक्षित झाले आहे. इतक नव्हे तर छोट्या व्यावसायिकांना Whats Appचा वापर लॅडलाईन क्रमांकावर करता येऊ शकतो. (वाचा : लॅडलाईन नंबरवर सुरू करू शकता Whats App; 'या' टिप्स फॉलो करा!) कसे सुरू कराल लॅडलाईनवर Whats App 1) सर्वात आधी तुमच्या मोबाइल फोनवर WhatsApp Business डाऊनलोडन करून घ्या. 2) त्यानंतर अ‍ॅप ओपन करुन देशाची निवड करा. देशाची निवड केल्यानंतर तुमच्याकडून 10 अंकी मोबाइल नंबर विचारला जाईल. या ठिकाणी तुम्ही लॅडलाईन नंबर देखील देऊ शकता. 3)ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाल SMS अथवा कॉल केला जाईल. तुम्ही लॅडलाईन नंबर दिल्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी SMS येणार नाही. पण Whats App प्रथम व्हेरिफिकेशनसाठी SMS पाठवते. एक मिनिटानंतर पुन्हा एकदा SMS किव्हा कॉलचा पर्याय अ‍ॅक्टिव्ह होतो. तेव्हा तुम्ही Call Meचा पर्याय निवडा. 4) तुम्ही Call Meचा पर्याय निवडतात लॅडलाईन नंबरवर फोन येईल. या फोनमध्ये 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड सांगितला जाईल. 5) संबंधित कोड तुम्ही अ‍ॅपमध्ये टाकताच लॅडलाईन नंबरचा वापर WhatsAppसाठी करू शकता. 6) विशेष म्हणजे या नंबरसाठी तुम्ही WhatsAppवर प्रोफाईल फोटो आणि नाव असे फीचर्स वापरू शकता. मद्यधुंद तरुणानं थेट फुटपाथवर घुसवली कार, भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO
First published:

Tags: Facebook, Whats app feature

पुढील बातम्या