Elec-widget

WhatsApp डीलीट झाल्यानंतरही सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स, सेटिंगमध्ये करा 'हा' बदल

WhatsApp डीलीट झाल्यानंतरही सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स, सेटिंगमध्ये करा 'हा' बदल

समजा तुमचा फोन चोरीला गेला किंवा फोन बंदच पडला तर? असं काही घडलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे आपल्या चॅट्सचा (chats). चॅट बॅकअपसाठी तुम्ही 'हा' पर्याय निवडा.

  • Share this:

समजा तुमचा फोन चोरीला गेला किंवा फोन बंदच पडला तर? असं काही घडलं की आपल्या डोक्यात सर्वात आधी विचार येतो तो म्हणजे आपल्या चॅट्सचा (chats). WhatsApp हे चॅटिंग अ‍ॅप जगभरात प्रसिद्ध आहे.  WhatsAppवर आपण खासगी, व्यावसायिक, कार्यालयासंबंधी काम, हरतऱ्हेच्या गप्पागोष्टी करत असतो. पण समजा या अ‍ॅपवर शेअर केलेले महत्त्वाचे चॅट्स किंवा मीडिया फाईल्स अचानक गायब झाल्यास, तर तुमच्यासाठी हा मोठा झटका असेल.

त्यामुळे अशी कोणतीही चूक तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्ही WhatsApp चॅट बॅकअपचा पर्याय स्वीकारा आणि आपला डेटा सुरक्षित ठेऊ शकता.

या फीचरच्या माध्यमातून युजर चॅट हिस्ट्री, वॉइस मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ एका प्रायव्हेट बॅकअप गुगल ड्राईव्हवर सेव्ह करू शकता. जेणेकरून तुमचा फोन हरवल्यास, बिघडल्यास किंवा अचानक डेटा डिलिट झाल्यास गुगल ड्राईव्हवरून तुम्ही डेटा पुन्हा मिळवू शकता.

(वाचा : फिंगरप्रिंटनं लॉक-अनलॉक करा WhatsApp, फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट)

यासाठी आधी आपल्या WhatsAppची चॅट हिस्ट्री save करावी... अशी बदला सेटिंग

Loading...

1. चॅटचं बॅकअप घेण्यासाठी सर्वात आधी WhatsApp ओपन करा.

2. यानंतर Menu Button वर जा.

3. यानंतर Settings ओपन करा

4. चॅट (Chats) पर्याय निवडावा

5. आता चॅट बॅकच्या पर्यायावर जा.

6.बॅक अप(Backup)बटणावर टॅप करा. किंवा

7. Backup आपोआपदेखील सेट करू शकता.

(वाचा : सावधान! तुमचा स्मार्टफोन चेक केला का? 'या' 24 अ‍ॅप्समध्ये मिळालाय व्हायरस)

येथे तुम्हाला आणखी काही पर्यायदेखील मिळतील. उदाहरणार्थ बॅक अप डेली (Daily), वीकली (Weekly), मंथली (monthly)असे पर्याय तुम्हाला दिसतील. तुम्हील डेलीचा पर्याय निवडल्यास गुगल ड्राईव्हवर तुमचा डेटा नियमित सुरक्षितरित्या सेव्ह केला जाईल.  पण तुमच्या व्हायफाय नसल्यास 'वीकली'चा पर्याय सेट करावा. कारण बॅक अपसाठी प्रचंड प्रमाणात डेटा खर्च होतो.

वाचा :तुम्ही Social Media वर पोस्ट लाइक, शेअर का करता? वाचा काय आहे कारण

VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 11:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...