फिंगरप्रिंटनं लॉक-अनलॉक करा WhatsApp, फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट

फिंगरप्रिंटनं लॉक-अनलॉक करा WhatsApp, फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट

नुकतंच व्हॉट्स अ‍ॅपनं सुरक्षेचा विचार करता युजर्ससाठी फिंगर प्रिंट लॉक हे नवीन फीचर आणलं आहे.

  • Share this:

जगप्रसिद्ध असलेलं चॅटिंग अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅप युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. एवढंच नाही तर युजर्सच्या सुरक्षेच्यासंदर्भातही कंपनीकडून प्रयत्न वारंवार सुरू असतात. नुकतंच व्हॉट्स अ‍ॅपनं सुरक्षेचा विचार करता युजर्ससाठी फिंगर प्रिंट लॉक हे नवीन फीचर आणलं आहे. या फीचरद्वारे तुम्ही फिंगरप्रिंट स्कॅनरच्या माध्यमातून अ‍ॅप लॉक करू शकता. दरम्यान, आयफोन युजर्ससाठी कंपनीनं हे फीचर आधीच Touch ID या नावानं लाँच केलं आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी हे फीचर आता बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. हे फीचर अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅप कसं सुपक्षित ठेवलं जाऊ शकतं, हे जाणून घेऊया.

(वाचा :सावधान! तुमचा स्मार्टफोन चेक केला का? 'या' 24 अ‍ॅप्समध्ये मिळालाय व्हायरस)

अँड्रॉईडवर असं करा फीचर अ‍ॅक्टिव्हेट

अँड्रॉईड युजर्ससाठी व्हॉट्स अ‍ॅप बीटा व्हर्जनवर 2.19.221 हे फीचर उपलब्घ करुन देण्यात आलं आहे. फिंगर प्रिंट लॉक अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी सर्वांत आधी अकाउंट सेटिंगमध्ये जावं. येथे प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करून फिंगर प्रिंट लॉक ऑप्शनमध्ये जा आणि फीचर अ‍ॅक्टिव्हेट करा.

विशेष म्हणजे अ‍ॅप किती वेळासाठी लॉक करायचं आहे? याचाही पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. यासाठी त्वरित, 1 मिनिट आणि 30 मिनिटं असे पर्याय तुम्हाला तेथे दिसतील.

(वाचा :तुम्ही Social Media वर पोस्ट लाइक, शेअर का करता? वाचा काय आहे कारण)

iOS युजर्स :

iOSवर व्हॉट्स अ‍ॅप फिंगरप्रिंट लॉक फीचर अ‍ॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

- App सेटिंग

- प्रायव्हसी ऑप्शन

- स्क्रीन लॉक ऑप्शन, त्यातील टॉगल ऑन करा. फीचर अ‍ॅक्टिव्हेट होईल.

(वाचा :आता तुम्ही गुगलवरून करू शकता WhatsApp Video आणि Audio कॉल, हे आहे नवंकोरं फीचर)

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 07:20 AM IST

ताज्या बातम्या