YouTubeवरील व्हिडीओ सतत बफर होतात का? वापरा या भन्नाट ट्रिक्स

यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहताना सतत बफरींग होतं का? मग हे उपाय नक्की वाचा.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 07:39 AM IST

YouTubeवरील व्हिडीओ सतत बफर होतात का? वापरा या भन्नाट ट्रिक्स

आताचा जमाना डिजिटलचा आहे. आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवटदेखील सोशल मीडियाच्या वापरानंच होता. जणू काही सोशल मीडियाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अलिखित नियमच झाला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा तर आपण खासगी तसंच  कार्यालयीन कामासाठी वापर करतोच. पण आपल्यापैकी बहुतांश जणांकडून व्हिडीओ पाहण्यासाठी यू-ट्यूबचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्हिडीओ ऑन केल्यानंतर तो अंतिम टप्प्यापर्यंत सलग पाहायला मिळाला तरच खरी मजा आहे. कारण कधी-कधी नेटवर्कच्या समस्येमुळे व्हिडीओ बफर होऊ लागतो आणि पुढे प्ले होण्यात अडथळे निर्माण होतात. तुम्हीदेखील या समस्येमुळे हैराण आहात का? पण काळजी करू नका. जिथे समस्या आहेत, तिथे उपायदेखील असतात. व्हिडीओ बफर होऊ नये, यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या आपण जाणून घेऊया. या ट्रिक्सचा वापर केल्यास तुम्ही नॉनस्टॉप व्हिडीओ पाहू शकणार आहात.

अ. पहिली पद्धत : यू-ट्यूबचे कॅश क्लिअर करा

1. सर्वात आधी फोन, टॅबलेट किंवा कम्प्युटरवर ज्या ब्राउझरचा वापर तुम्ही करता, तेथे जा.

2. मेन्यू ऑप्शनमध्ये तुम्हाला 'तीन रेषा' असलेला एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3. यानंतर फोनमधील हिस्ट्रीमध्ये जाऊन क्लिअर 'ब्राउझिंग डेटा' पर्यायावर क्लिक करा.

Loading...

4. जर तुम्ही कम्प्युटरवर यूट्यूब पाहता, तर More Toolsमध्ये जाऊन 'ब्राउझिंग डेटा' वर टॅप करा.

(वाचा :नवं फीचर! आता WhatsApp स्टेटस तुम्ही फेसबुकवरही करू शकता शेअर)

5. डेटा डिलिट करण्यासाठी अँड्रॉईड, मॅक किंवा कम्प्युटर युजर्स एक टाइम रेंजदेखील निवडू शकतात. पण हा पर्याय सध्या आयफोन्सवर उपलब्ध नाही.

6. cookies and site data आणि cached images and files पर्याय निवडावा

7. यानंतर 'क्लिअर डेटा' या पर्यायावर क्लिक करावं

(वाचा :  WhatsApp डीलीट झाल्यानंतरही सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स,सेटिंगमध्ये करा 'हा' बदल)

ब. दुसरी पद्धत : अशी बदला व्हिडीओ क्वालिटी

1. व्हिडीओ क्वालिटी बदलण्यासाठी यू-ट्यूब व्हिडीओच्या खालील बाजूस उजवीकडे दिलेल्या 'गिअर आयकन' वर टॅप करा.

2. येथे तुम्हाला व्हिडीओसाठी कमी रिझोल्यूशनचा (Resolution) पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर व्हिडीओ आधीच्या तुलनेत जलद गतीनं चालण्यास मदत होईल.

3. डेस्कटॉपसाठी हे फीचर सध्या उपलब्ध नाही.

(वाचा : फिंगरप्रिंटनं लॉक-अनलॉक करा WhatsApp, फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट)

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 07:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...