Jio ग्राहकांसाठी खूशखबर! अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी मिळणार एवढा फ्री टॉकटाइम

Jio ग्राहकांसाठी खूशखबर! अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी मिळणार एवढा फ्री टॉकटाइम

रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं (Reliance Jio Infocomm) आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे.

  • Share this:

रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं (Reliance Jio Infocomm) आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीनं ग्राहकांसाठी 30 मिनिटे फ्री टॉक टाइमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या फोनमध्ये पहिल्यांदा रिजार्च करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉक टाइम मिळणार आहे. ही सुविधा वन टाइम ऑफर प्लानच्या घोषणेनंतर पहिल्या सात दिवसांसाठीच उपलब्ध असेल. रिचार्ज पॅक करणाऱ्या ग्राहकांना मेसेजद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. रिलायन्स जिओनं 9 ऑक्टोबर रोजी IUC चार्जची घोषणा केली होती. यामध्ये Relaince JIO जिओ नेटवर्कवरून अन्य कुठल्याही मोबाइल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनमागे ग्राहकांना  6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क मोजावं लागणार आहे. रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे.

(वाचा :JIOने फ्री कॉल केले बंद, पण Vodafone-Ideaने ग्राहकांना दिला मोठा दिलासा)

हे आहेत जिओचे नवीन टॉप अप प्लान्स

जिओ नेटवर्कनं दुसऱ्या मोबाइल नेटवर्क ग्राहकांना कॉल करण्यासाठी नवीन प्लान्सदेखील जारी केले आहेत. यासाठी 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंतचे प्लान्स ग्राहकांसाठी आणण्यात आले आहेत. 10 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना अन्य नेटवर्कसाठी 124 मिनिटांचं कॉलिंग तर 20 रुपयांमध्ये 249 मिनिटांच्या कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 50 रुपयांत 656 मिनिटं आणि 100 रुपयांच्या प्लानमध्ये 1362 मिनिट कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान, उपलब्ध करून देण्यात आलेल्या टॉक टाइमचा वापर न झाल्यास भरपाई म्हणून तेवढाच डेटा युजर्संसाठी दिला जाणार आहे. 10 रुपयांच्या टॉपअपवर1 जीबी, 20 रुपयांत 2 जीबी, 50 रुपयांत 5 जीबी आणि 100 रुपयांत 10 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

(वाचा :JIO ने फ्री कॉलिंगसंदर्भात केली आणखी एक मोठी घोषणा; ग्राहकांना दिलासा)

हे IUC चार्ज म्हणजे काय?

इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.

देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आग्रही आहे.

TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत.

IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.

IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.

Jio ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.

(वाचा : IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण)

मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांसोबत मॉर्निंग वॉक, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading