दिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या

जवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे.

जवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : Google कडून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay च्या भारतीय युजर्ससाठी नवा लोगो जारी करण्यात येत आहे. हा नवीन logo Google Pay च्या 116.1.9 (Beta) वर्जनसह जारी करण्यात येणारकंपनी लवकरच Google Pay चं फायनस वर्जन जारी करणार आहे. 9to5Google वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Google Pay च्या नव्या लोगोमध्ये U आणि N इंटरलॉकिंग केल्याचं दाखवण्यात आलं आहे. जो 3D डिझाइनप्रमाणे वाटतो. Google Pay चा नवा लोगो जुन्या लोगोहून अगदी वेगळा आहे. नव्या लोगोमध्ये थीम कलर रेड, ग्रीन, यलो आणि ब्लू रंगाचा वापर करण्यात आला आहे. परंतु लोगोच्या डिझाइनमधून G आणि Pay शब्द पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. Google Pay सर्वात आधी भारतात Tez नावाने लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचं नाव बदलून Google Pay करण्यात आलं. Google Pay App भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु आता याच्या लोगोमध्ये कंपनीकडून काही बदल करण्यात येत आहेत. Google ने याआधी Gmail सह कंपनीच्या इतर अनेक ऍपच्या logo मध्ये बदल केले आहेत. (वाचा - जुनी द्या अन् नवी गाडी घ्या, सरकारकडून स्पेशल सूट, जाणून घ्या काय आहे प्लान) जवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे. हे ऍप संपूर्ण जगात एका महिन्यात सरासरी 10 मिलियन म्हणजे जवळपास 1 कोटी वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. भारत Google Pay चा मोठा युजरबेस आहे. भारतात 78 लाख लोकांनी Google Pay डाउनलोड केलं आहे.

  (वाचा - Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा)

  मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे. अद्याप कंपनीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यापूर्वीही google ने आपल्या अनेक ऍपच्या लोगोमध्ये बदल केले होते. मात्र सोशल मीडियावर, या लोगो किंवा आयकॉनमध्ये बदल केल्याने कन्फ्युजन होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: