Elec-widget

नवं फीचर! आता WhatsApp स्टेटस तुम्ही फेसबुकवरही करू शकता शेअर

नवं फीचर! आता WhatsApp स्टेटस तुम्ही फेसबुकवरही करू शकता शेअर

व्हॉट्स अ‍ॅपच्या नवीन फीचरद्वारे तुम्ही आपलं व्हॉट्स अ‍ॅप स्टोरी थेट फेसबुक मेसेंजरच्या स्टोरीजवर शेअर करू शकणार आहात.

  • Share this:

व्हॉट्स अ‍ॅपनं आपल्या युजर्ससाठी नवं कोरं आणि भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरद्वारे तुम्ही आपलं व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस थेट फेसबुक मेसेंजरच्या स्टोरीजवर शेअर करू शकणार आहात. सुरुवातीला हे फीचर केवळ बीटा व्हर्जन युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं. पण हे दमदार फीचर आता सर्व युजर्संच्या फोनमध्ये अपडेट झालं आहे.

फेसबुक स्टोरीप्रमाणेच व्हॉट्स अ‍ॅपवर अपलोड केलेलं स्टेटस 24 तास दिसतं. या नवीन अपडेटमुळे तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस फेसबुकशी लिंक करता येणार आहे. पण व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस डिलिट केल्यानंतरही फेसबुकवरील स्टेटस कायम राहिली, तिथलं स्टेटस डिलिट होणार नाही.

(वाचा : धक्कादायक! फोनची बॅटरी ठरवते तुमचा मूड, हे वाचलंत का?)

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस फेसबुकवर शेअर केल्यानंतर तिथली स्टोरी स्क्रीनशॉटप्रमाणे दिसते. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरून फेसबुकवर शेअर केलेल्या स्टेटसमध्ये केवळ फोटो किंवा पिक्चर टेक्स्टचं दिसेल. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लिंक शेअर केल्यास फेसबुवर स्टोरीमध्ये दिसणार नाही.

(वाचा :WhatsApp डीलीट झाल्यानंतरही सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स,सेटिंगमध्ये करा 'हा' बदल)

Loading...

...तर स्टेटस शेअर होणार नाही

जर तुम्हाला WhatsApp स्टेटस Facebook वर शेअर करायचं असल्यास तुमच्या फोनमध्ये Facebook, Facebook Lite आणि iPhone मध्ये फेसबुक App असणं आवश्यक आहे. तसंच अद्याप तुमच्या व्हॉट्स अ‍ॅपमध्ये हे नवीन फीचर अ‍ॅड झालेलं नसल्यास प्ले स्टोअरमध्ये जाऊन नवीन व्हर्जन अपडेट करून घ्यावं.

(वाचा :फिंगरप्रिंटनं लॉक-अनलॉक करा WhatsApp, फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट)

बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 09:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...