ALERT : सेल्फीसाठी अॅप वापरताय? तुमचं खासगी बोलणंही कोणीतरी ऐकतंय

सेल्फी काढण्यासाठी लोकप्रिय असलेली अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 10:00 AM IST

ALERT : सेल्फीसाठी अॅप वापरताय? तुमचं खासगी बोलणंही कोणीतरी ऐकतंय

मुंबई, 22 सप्टेंबर : गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अॅप्समधून डेटा चोरी होत असल्याची माहिती समोर येत असते. काही दिवसांपूर्वी कॅम स्कॅनर अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं. ते अपडेट केल्यानंतर आता पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलं होतं. आता या आणखी दोन अॅप हटवण्यात आली आहेत.

मोबाईल सिक्युरिटी फर्म वांडेरा रिसर्चर्सने सन प्रो ब्यूटी आणि फनी स्वीट ब्यूटी सेल्फी कॅमेरा नावाची अॅपमध्ये अॅडवेअर सापडला आहे. ही दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअरवरून 15 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केली आहेत. पॉप अप अॅडच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याने अॅप काढून टाकली आहेत.

गुगलने सांगितलं की अॅप सुरू असताना बॅकग्राउंडला अॅड तशाच रहायच्या. त्यामुळे युजरला अडचण येत होती. तसेच फोनच्या बॅटरीवरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे आता गुगलने ही अॅप अनइन्स्टॉल करायला सांगितली आहेत.

दोन्ही अॅपमध्ये अॅडवेअरशिवाय अनेक मेलिसियस कोडसुद्धा आहेत. एवढंच नाही तर दोन्ही अॅप्स ऑडिओ रेकॉर्डिंगसह इतरही अनेक परवानग्या मागत होते. यामुळे तुमचं बोलणं रेकॉर्ड करून त्याचा अॅडसाठी वापर होत आहे.

कॅमस्कॅनरमध्ये नुकताच धोकादायक मेलवेअर आढळला होता. मेलवेअर काढून टाकल्यानंतर याची माहिती डेव्हलपर्सनी युजर्सना दिल्यानंतर पुन्हा नवीन अपडेट उपलब्ध करून दिले होते.

Loading...

अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...