सावधान! तुमचा स्मार्टफोन चेक केला का? 'या' 24 अ‍ॅप्समध्ये मिळालाय व्हायरस

तुमच्या फोनमध्ये आहेत का हे 24 अ‍ॅप्स? मग आधी ते डिलिट करा

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 02:28 PM IST

सावधान! तुमचा स्मार्टफोन चेक केला का? 'या' 24 अ‍ॅप्समध्ये मिळालाय व्हायरस

अँड्रॉईड युजर्संसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म (cyber security firm)नं केलेल्या एक रीसर्चमध्ये एक अशा मालवेअरचा शोध लावला आहे, ज्यामुळे प्ले स्टोअरमधील तब्बल 24 अ‍ॅप्स वाईट पद्धतीनं प्रभावित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 4.72 लाखहून अधिक युजर्संनी हे अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये डाउनलोड केले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या या अ‍ॅप्समध्ये 'जोकर' नावाचा व्हायरस आढळून आला आहे.

हा व्हायरस जाहिराती असणाऱ्या वेबसाइट्सद्वारे सहज तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो. यानंतर तुमचे मेसेज, संपर्क यादी आणि फोनमधील महत्त्वपूर्ण माहिती चोरतो. संशोधकांना ज्या 24 अ‍ॅप्समध्ये हा धोकादायक व्हायरल आढळून आलाय त्याची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये जर हे अ‍ॅप्स असतील तर तातडीनं डिलिट करा.

(वाचा : आता तुम्ही गुगलवरून करू शकाल WhatsApp Video आणि Audio कॉल, हे आहे नवंकोरं फीचर)

लवकरात लवकर डिलिट करा हे अ‍ॅप

1.बीच कॅमरा 4.2 (Beach Camera 4.2)

Loading...

2.मिनी कॅमरा 1.0.2 APK (Mini Camera 1.0.2)

3.सर्टन वॉलपेपर 1.02 APK (Certain Wallpaper 1.02)

4.रिवॉर्ड क्लीन 1.1.6 APK (Reward Clean 1.1.6 APK)

5.ऐज फेस 1.1.2 (Age Face 1.1.2)

6.ऑल्टर मेसेज 1.5APK (Altar Message 1.5APK)

7.सोबी कॅमरा 1.0.1 (Soby Camera 1.01)

8.डीक्लेयर मेसेज (Declare Message)

9. डिस्प्ले कॅमरा 1.02 (Display Camera 1.02)

10.रॅपिड फेस स्कॅनर 10.02 (Rapid Face Scanner 10.2)

11. लीफ फेस स्कॅनर 1.0.3 (Leaf Fase Scanner 1.0.3)

12. बोर्ड पिक्चर एडिटिंग 1.1.2 (Board Picture Editing 1.1.2)

(वाचा : गुड न्यूज! विक्रम लँडर पूर्णपणे सुरक्षित, ऑर्बिटरनं पाठवलेल्या फोटोतून झालं स्पष्ट)

13.क्युट कॅमरा 1.04 APK (Cute Camera 1.04 APK)

14. डॅजल वॉलपेपर 1.01 (Dazzle Wallpaper 1.01)

15. स्पार्क वॉलपेपर 1.1.11 (Spark Wallpaper 1.1.11)

16.क्लायमेट एसएमएस 3.5 (Climate SMS 3.5)

17. ग्रेट वीपीएन 2.0  (Great VPN 2.0)

18.ह्युमर कॅमरा 1.1.5 (Humour Camera 1.1.5)

19. प्रिंट प्लांट स्कॅन (Print Plant scan)

20. अ‍ॅडव्होकेट वॉलपेपर 1.1.9 (Advocate Wallpaper 1.1.9)

21.रड्डी एसएमएस मॉड (Ruddy SMS Mode)

22. इग्नाइट क्लीन 7.3 (Ignite Clean 7.3)

23. अँटी व्हायरस सिक्यॉरिटी-सिक्यॉरिटी स्कॅन, अ‍ॅप लॉक (Antivirus Security - Security Scan,App Lock)

24. कोलेट फेस स्कॅनर अ‍ॅप(Collate Face Scanner)

(वाचा : दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, तुम्हीच बघा!)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुगलनं आपल्या प्ले स्टोअरमधून 27 अ‍ॅप्स डिलिट केले होते.

VIDEO: भरधाव कारमधून रस्त्यावर पडली दीड वर्षाची चिमुकली, पुढे काय झालं तुम्हीच पाहा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 02:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...