Facebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक!

हॅकर्सनी एक स्पायवेअर तयार केलं आहे ज्याच्या माध्यमातून फेसबूक, गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडचा डेटा अॅक्सेस केला जातो.

  • Share this:

स्मार्टफोनमध्ये असलेल्या अॅप्समुळे डेटा सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं समोर येतो. सध्या फेसबुकचे फेसअॅप धुमाकूळ घालत आहे. हॅकर्सनी एक स्पायवेअर तयार केलं आहे ज्याच्या माध्यमातून फेसबूक, गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडचा डेटा अॅक्सेस केला जातो. एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने हे स्पायवेअर डिझाईन केलं आहे.

NSO ग्रुपने Pegasus नावाचं हे टूल तयार केलं असून Google Drive किंवा iCloud चा डेटा अॅक्सेस करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर तुमचे फेसबुक मेसेंजरसुद्धा अॅक्सेस करू शकतं.

एकदा तुमच्या स्मार्टफोनवर हे स्पायवेअर आलं की तुमच्या क्लाउड अकाउंटमधून संपूर्ण हिस्ट्री डाउनलोड करते. हे स्पायवेअर अवैध असूनही यूजर्सचे अकाउंट हॅक करते.

रिपोर्टनुसार कंपनी अशा प्रकारची सॉफ्टवेअर एजन्सीसाठी तयार करते. यामध्ये सरकारी संस्थांचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये यावर्षी सुरुवातीला Uganda साठी कंपनीने एक पेपर तयार केला होता यामध्ये Pegasus बद्दल चर्चा केली होती.

यापूर्वी इस्त्रायलच्या या कंपनीने WhatsApp ची हेरगिरी केली होती. आता इतर सोशल साइटसुद्धा टार्गेट केल्या जात आहेत. अद्याप गुगल, फेसबुकने असे पुरावे मिळाले नसल्याचं म्हटलं आहे. तरीही इतर कंपन्यांनी अशा प्रकारे हॅकिंग होऊ शकतं का याची चाचपणी करत असल्याचं म्हटलं आहे.

NSO च्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही अशा प्रकारचे मास कलेक्शन करणारे हॅकिंग टूल पुरवत नाही. मात्र कंपनीने असे टूल तयार केले नाही असे म्हटले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:41 AM IST

ताज्या बातम्या