मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फोल्डेबल स्मार्टफोन! 6.65 इंचाचा मोबाईल उलगडताच होणार 10 इंच

फोल्डेबल स्मार्टफोन! 6.65 इंचाचा मोबाईल उलगडताच होणार 10 इंच

फोल्डेबल फोन हा युजरची स्मार्टफोन आणि टॅबलेटची गरज एकाचवेळी पूर्ण करत आहे. यामुळेच अनेक कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन निर्मितीमध्ये उतरत आहेत.

    मुंबई, 09 मार्च : स्मार्टफोनमध्ये सध्या अनेक जबरदस्त अशी फीचर्स येत आहेत. याशिवाय त्याच्या डिझाइनमध्येही बदल असतात. जगभरात आता फोल्डेबल स्मार्टफोनची क्रेझ वाढत आहे. अनेक कंपन्या हाय टेक आणि नव्या डिझाइनचे फोल्डेबल फोन बाजारात उतरवण्याची तयारी करत आहेत. आता टीसीएल कंपनी दोन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 6.65 इंचाचा डिस्प्ले असून तो अनफोल्ड करताच 10 इंच इतका होईल. सध्या या फोनचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोल्डेबल फोन स्पेशल अशा हिंजमुळे फोल्ड होतो. पुर्णपणे फोल्ड केल्यानंतर फोनची जाडी वाढते. मात्र हिंजमुळे फोनचा वापर टॅबलेटसारखा करता येतो. इतरही अनेक कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोनसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे लवकरच फोल्डेबल फोनची साइज आणि वजन कमी होऊ शकते. सुरुवातीला फोल्डेबल फोन ही फक्त कल्पना मानली जात होती पण आता कंपनी लाँच करण्याचा विचार कर तआहे. गेल्या एक दोन वर्षांत ऑनलाइन कंटेंट आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगचे प्लॅटफॉर्मचे प्रमाण वाढल्यानं मोठ्या स्क्रीनच्या मोबाईलचा वापरही वाढला आहे. त्यामुळे फोल्डेबल फोन हा युजरची स्मार्टफोन आणि टॅबलेटची गरज एकाचवेळी पूर्ण करत आहे. यामुळेच अनेक कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन निर्मितीमध्ये उतरत आहेत. हे वाचा : 100 कोटी युजर्सचा डेटा धोक्यात, चेक करा तुमच्या स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन! टीसीएलचा फोल्डेबल फोनमध्ये कोणती फीचर्स असतील याची माहिती समोर आलेली नाही. मात्र काही रिपोर्टनुसार या फोनमध्ये तीन बॅटरी असण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनच्या प्रोटोटाइपला गेल्या महिन्यात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मांडणार होती. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. हे वाचा : WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Smartphone

    पुढील बातम्या