Kwid आणि S-Presso ला टक्कर देण्यासाठी येत आहे Tata ची छोटी SUV

Kwid आणि S-Presso ला टक्कर देण्यासाठी येत आहे Tata ची छोटी SUV

. ही कार मागील Geneva Motor show मध्ये सादर केली होती. ही कार मिनी एसयुव्ही H2X कॉन्सेप्ट कारवर आधारीत असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : भारतीय ऑटो मार्केटमध्ये टाटा मोटर्स या वर्षी धमाकेदार सुरुवात करणार आहे.  कंपनी ऑटो एक्सपो 2020 मध्ये चार नव्या गाड्या लाँच करणार आहे. टाटा मोटर्सने दावा केला आहे या इव्हेंटमध्ये नवीन 12 गाड्या लाँच करणार आहे. या गाड्यांमध्ये एकापेक्षा एक फिचर्स असणार आहे. यामध्ये टाटा मोटर्सच्या एका छोट्या एसयुव्हीचाही समावेश आहे. लाँच झाल्यानंतर ही कार Mahindra KUV100, Maruti Suzuki S-Presso आणि Renault Kwid ला टक्कर देणार आहे.

कधी होणार लाँच

ऑटोकार इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  कंपनी आपल्या या छोट्या एसयुव्हीबद्दल लवकरच घोषणा करणार आहे. ही कार मागील Geneva Motor show मध्ये सादर केली होती. ही कार मिनी एसयुव्ही H2X कॉन्सेप्ट कार वर आधारीत असणार आहे. ही कार टाटाच्या इतर एसयुव्ही कारपेक्षा सर्वात छोटी असणार आहे. तसंच ही कार नेक्सॉनपेक्षा थोडी छोटी असणार आहे. मात्र, अजून कार लाँच करण्याबद्दल अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं नाही. पण ही कार याच वर्षी लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

अशी असेल छोटी एसयुव्ही

या छोट्या एसयुव्हीला इव्हेंटमध्ये सादर केल्यानंतर सर्व फिचर्स आणि तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार फक्त पेट्रोल मॉडेल म्हणून लाँच केली जाईल. यामध्ये Tata Altroz आणि Tiago चं 1.2-litre पेट्रोल इंजिन दिले जाईल.

ऑटो एक्सपोमध्ये टाटा आपल्या ग्राहकांसाठी बरंच काही घेऊन येणार आहे. यासोबत एका नवीन एसयुव्हीसोबत 7 सीटर कार  Gravitas, Harrier ऑटोमॅटिकही आणणार आहे. यासोबतच टाटा Tiago आणि Tigor चे नवीन मॉडेलसह Nexon चं नवीन  फेसलिफ्ट मॉडेल सुद्धा घेऊन येणार आहे.

First published: January 11, 2020, 11:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading