बिग ऑफर! टाटा कंपनीच्या कारवर एका लाखापर्यंत डिस्काऊंट

बिग ऑफर! टाटा कंपनीच्या कारवर एका लाखापर्यंत डिस्काऊंट

स्टॉक क्लिअर करण्यासाठी टाटा कंपनी कारवर एक लाख रुपयांपर्यंत खास डिस्काऊंट आणि स्कीम देत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण टाटा मोटर्स काही खास ऑफर्स तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. 2019 वर्ष संपताना म्हणजे वर्षाखेरीस स्टॉक क्लिअर आणि न्यू इयर सेल असे आणि कारणांनिमित्तानं कंपनी सूट देत असतात. कोणती कंपनी किती सूट आणि चांगल्या सुविधा देते यामध्ये स्पर्धे असते. टाटा मोटर्स आपल्या कारवर स्टॉक क्लिअर करण्यासाठी मोठा डिस्काऊंट देत असल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही टाटाची कार घेण्याचा विचार करत असाल तर या गाड्या घेण्याचा विचार करा कारण यावर तुम्हाला तब्बल एक लाख रुपयांचा डिस्कांऊट कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्टॉक क्लिअर करण्यासाठी टाटा मोटर्स (Tata Motors)टियागो हॅचबॅक, टिगोर कॉम्पॅक्ट सेडान, नेक्सॉन कॉम्पॅक्ट आणि नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूवी या कारच्या मॉडेल्सवर मोठी ऑफर दिली जात आहे. यामध्ये बोनस, कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर्स आणि इतर बेनिफिट्सचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे.

Tata Tigor-

टाटाची ही सेडान कार आपल्या किमतीपेक्षा खूपच जास्त रॉयल आहे. ही कार आरामदायी असल्यामुळे ग्राहकांची या मॉडेलला मोठी पसंती आहे. या कारवर तुम्हीला एक लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. लवकरच कंपनीकडून टिगोर फेसलिफ्ट कार लाँच करण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला बीएस-6 कम्प्लायंट पेट्रोल इंजिनसोबत ही कार असेल याची किंमत 5 लाख 49 हजार ते 7 लाख 89 हजार रुपयांपर्यंत असेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Tata Nexon-

नेक्सॉनवर तुम्हाला 95 हजारांचा डिस्काऊंट मिळणार आहे. ग्लोबल एसीएपी सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळवणारी भारतातील पहिली कार म्हणून या मॉडेलची वेगळी ओळख आहे. या कारला हुंडई वेन्यू, मारुति सुजुकी विटारा ब्रेजा, महिंद्रा XUV 300 आणि फोर्ड ईको स्पोर्ट कंपेअर केलं जातं. त्यामुळे या कारची स्पर्धा महिंद्रा आणि मारुती गाड्यांसोबत आहे. या कॉम्पॅक्ट एसयूवी कारचा लूकही इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. टाटा नेक्सॉन कारची किंमत साधारण 6 लाख 58 हजार ते 11 लाख 1 हजार रुपयांपर्यंत आहे.

Tata Tiago-

टाटा टियागो या कारवर 90 हजार रुपयांची सूट तुम्हाला मिळणार आहे. याशिवाय टियागो कारची किंमत लाँच झाल्यापासूनच कमी असल्यामुळे स्वस्तात मस्त कार म्हणून ग्राहकांची जास्त पसंती आहे. टाटा टियागो कारची किंमत साधारण 4 लाख 39 हजार ते 6 लाख 76 हजार रुपयांपर्यंत जाते. बीएस-6 कम्प्लायंससोबत फेसलिफ्ट डिजाइनमध्ये ही कार पुन्हा लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा लूक, सुविधा पाहता ही गाडी कमी किमतीती ग्राहकांना जास्त फायदा देणारी असल्यानं कंपनीकडून यावर 90 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

त्यामुळे स्टॉक क्लिअर करण्यासाठी जरी टाटा मोटर्सने या खास कारवर डिस्काऊंट दिला असला तरीही कॅशबॅक, बोनस आणि इतरही काही खास सूट तुम्हाला कंपनीतर्फे देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरुमसोबत संपर्क साधावा.

Published by: Akshay Shitole
First published: December 16, 2019, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading