Home /News /technology /

तमिळनाडूतील हे जोडपं करणार भारतातील पहिलं Metaverse रिसेप्शन, पाहा 3D इन्वाइट VIDEO

तमिळनाडूतील हे जोडपं करणार भारतातील पहिलं Metaverse रिसेप्शन, पाहा 3D इन्वाइट VIDEO

भारतातील एक जोडपं मेटावर्समध्ये (Metaverse) आपल्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करत आहे. शिवलिंगपुरम गावात ते लग्न करणार आहेत. त्यानंतर मात्र ते रिसेप्शन व्हर्चुअली (Virtual reception) होस्ट करणार आहेत.

  नवी दिल्ली, 18 जानेवारी : भारतात एका लग्नाच्या अनोख्या रिसेप्शन (Marriage Reception) सोहळ्याची चर्चा आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा सोहळा संपूर्ण भारतात होत आहे. भारतातील एक जोडपं मेटावर्समध्ये (Metaverse) आपल्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करत आहे. तमिळनाडूतील दिनेश एसपी आणि जनगानंदिनी रामास्वामी पुढील महिन्याच्या एका रविवारी शिवलिंगपुरम गावात लग्न करणार आहेत. त्यानंतर मात्र ते रिसेप्शन व्हर्चुअली (Virtual reception) होस्ट करणार आहेत. मागील आठवड्यात दिनेश एसपीने ट्विटरवर घोषणा करत सांगितलं, की मला या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो की मी या जगातील इतक्या मोठ्या संधीचा सर्वात आधी पहिल्यांदाच लाभ घेत आहे. काहीतरी मोठी सुरुवात केल्याचं त्यांने म्हटलं आहे. पॉलीगॉन ब्लॉकचेनमध्ये भारतातील पहिल्या Metaverse विवाहाने TardiVerse Metaverse स्टार्टअपसह सहकार्य केलं आहे. हॉगवर्ट्स-थीम असणाऱ्या व्हर्चुअल रिसेप्शनमध्ये जगभरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबिय सामिल होतील. महत्त्वाची बाब म्हणजे जनगानंदिनीचे दिवंगत वडिलही या सोहळ्यात सामिल होऊ शकतील. त्यांच्या फोटोच्या आधारे त्यांचा मेटावर्स अवतार बनवला जाणार आहे.

  हे वाचा - या 5 Appsमुळे रात्रीच्या झोपेवर होतोय भयंकर परिणाम,तुम्ही या लिस्टमध्ये नाही ना?

  क्रिप्टोकरेन्सी इथिरियमचं मायनिंग करणारा दिनेश IIT मद्रासमध्ये प्रोजेक्ट असोसिएट आहे. तर त्याची पत्नी सॉफ्टवेयर डेव्हलपर आहे. दिनेश आणि जनगानंदिनीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांना मेटावर्सवर रिसेप्शन ठेवण्याचा विचार आला. जेणेकरुन अधिकाधिक लोक त्यांचं रिसेप्शन पाहू शकतील आणि कोरोना संक्रमणही पसरू नये. IIT मद्राससह एक प्रोजेक्ट असोसिएट दिनेशने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, की मला मेटावर्स वेडिंग रिसेप्शन ठेवण्याचा विचार आला आणि माझ्या पार्टनरनेही यासाठी संमती दिली.

  हे वाचा - मॅट्रिमोनियल साइटवरील इंजिनिअर निघाला भामटा; पुण्यातील महिलेला 62 लाखांचा गंडा

  काय आहे मेटावर्स? मेटावर्स 3D डिजीटल जग आहे. इथे वास्तविकता (ऑग्मेंटेड रिअॅलटी), व्हर्चुअल अर्थात आभासी वास्तविकता (VR) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलं जातं. इथे युजर्स आपला नकली अवतार तयार करुन एकमेकांना भेटून बोलू शकतात. हॅरी पॉटर फॅन असलेले दिनेश आणि जनगानंदिनी यांचा पारंपरिक कपड्यात अवतार असेल. यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची थीमही हॅरी पॉटर बेस्ड असेल. पाहुण्यांना लॉगइन डिटेल्स आणि पासवर्ड दिले जातील. इथे ते आपला अवतार निवडून रिसेप्शनमध्ये प्रवेश करू शकतील.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या