नवी दिल्ली, 10 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) युजर्सला एक वेगळीच समस्या येत आहे. अनेक युजर्सने त्यांच्याद्वारे केलेली पोस्ट अचानक डिलीट (Post delete) होत असल्याचं सांगितलं आहे. याबाबत अनेक युजर्सच्या तक्रारींनंतर इन्स्टाग्रामने हा एक बग असल्याची माहिती असून तो फिक्स केला असल्याचंही सांगितलं आहे. या बगमुळे पोस्ट, स्टोरीज तसंच हायलाईट्स देखील गायब होत होत्या. कंपनीचे प्रमुख एडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी युजर्सला ही समस्या एका बगमुळे आली असून ती आता फिक्स केली असल्याचं म्हटलं आहे.
इन्स्टाग्राममध्ये ही समस्या त्यावेळी आली, ज्यावेळी काही कार्यकर्ते हरवलेल्या महिलांबाबत जागरुकता अभियान चालवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या एखाद्या विषयाशी किंवा ठिकाणाशी संबंधित नव्हती, परंतु याचा परिणाम जगभरातील युजर्सवर पाहायला मिळाला, ज्यांना ही समस्या आली.
ट्विटरवर एका पोस्टमध्ये इन्स्टाग्रामने सांगितलं, की या बगमुळे पोस्ट आणि स्टोरीज आपोआप गायब झाले होते. गायब झालेलं फीड पुन्हा शेअर करण्यात आलं आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये या बगमुळे सर्वाधिक युजर्स प्रभावित झाले आहेत.
भारतीय युजर्सचा आरोप -
कंपनीने यात भारताचा उल्लेख केला नसला, तरी देशातील अनेक युजर्सनी इन्स्टाग्रामवर कोविड-19 शी संबंधित अपडेटबाबत या समस्येचा उल्लेख केला आहे.
इन्स्टाग्रामवर भारतीय युजर्सला गेल्या काही दिवसांत स्टोरी, पोस्ट आणि हायलाईट्सनमध्ये समस्या आल्या. जवळपास तेव्हापासूनच इन्स्टाग्रामने बगची सूचना दिली. कोविड-19 संबंधीत स्टोरीज आणि इतर पोस्ट हटवण्यात आल्याचं भारतीय युजर्सचं म्हणणं आहे. बगची समस्या अशावेळी आली, जेव्हा ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोरोनाची विस्फोटक परिस्थिती हाताळण्याबाबत सरकारवर टीका केली जात होती, त्यावेळी टीकेमुळेच युजर्सच्या अकाउंट्सवर बंदी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram, Social media, Tech news