मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /फोनमध्ये Storage Full झालंय? 'या' 4 पद्धतीने करू शकता मोफत डेटा सेव्ह

फोनमध्ये Storage Full झालंय? 'या' 4 पद्धतीने करू शकता मोफत डेटा सेव्ह

घरी कोणत्याही उपायांनी फोन ठीक न झाल्यास, सर्विस सेंटर किंवा कोणत्याही मोबाइल रिपेयरिंग शॉपमध्ये जावं लागेल. नेटवर्कची समस्या असल्यास तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशीही कॉन्टॅक्ट करू शकता.

घरी कोणत्याही उपायांनी फोन ठीक न झाल्यास, सर्विस सेंटर किंवा कोणत्याही मोबाइल रिपेयरिंग शॉपमध्ये जावं लागेल. नेटवर्कची समस्या असल्यास तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशीही कॉन्टॅक्ट करू शकता.

आपण नवीन फोन घेताना त्या फोनचं स्टोरेज (Phone storage) किती आहे ते हमखास बघतो, कारण फोनमध्ये स्टोरेज कमी असलं की मग फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा साठवण्यासाठी जागा कमी पडते. शिवाय फोनमध्ये स्टोरेज कमी आहे, हे सांगणार नोटिफिकेशन (Notification) सतत स्क्रीनवर झळकत राहतं.

पुढे वाचा ...

  मुंबई, 1 एप्रिल-  आपण नवीन फोन घेताना त्या फोनचं स्टोरेज (Phone storage) किती आहे ते हमखास बघतो, कारण फोनमध्ये स्टोरेज कमी असलं की मग फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा साठवण्यासाठी जागा कमी पडते. शिवाय फोनमध्ये स्टोरेज कमी आहे, हे सांगणार नोटिफिकेशन (Notification) सतत स्क्रीनवर झळकत राहतं. अनेक फोनचं इंटर्नल स्टोरेज वाढवता येतं. परंतु, काही फोन असे पण आहेत, ज्यांचं इंटर्नल स्टोरेज (Internal storage) आपल्याला वाढवता येत नाही, त्यामुळे आपल्याला डेटा साठवण्यात अडचणी येतात.

  स्टोरेज संपलं की बरेच जण नवीन फोन घेण्याचा विचार करतात, कारण त्यांना इतर स्टोरेज ऑप्शनबद्दल माहीत नसतं. आज असेच काही ऑनलाईन स्टोरेज ऑप्शन (Online storage option) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करून तुमचा डेटा त्या ठिकाणी स्टोअर करता येतो. सध्या काही फ्री स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी कोणतेही पैसे न भरता तुमचा डेटा स्टोअर होतो. तर काही ठिकाणी तुम्हाला तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी पैसे भरावे लागतात. आज आम्ही तुम्हाला फ्री मिळणाऱ्या काही क्लाउड स्टोरेजबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवू शकता. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

  1. गुगल ड्राईव्ह (Google drive)

  गुगल ड्राईव्ह सर्वात सोपं आणि सर्वांत जास्त वापरलं जाणारं क्लाउड स्टोरेज आहे. गुगलवर अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला 15 GB पर्यंतची फ्री स्पेस मिळते. इथे गुगल शीट्स, गुगल डॉक्युमेंट्स, गुगल स्लाईड्स आणि फोटो व्हिडीओ स्टोअर करता येतात.

  2. Microsoft OneDrive 5 GB

  मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राईव्हमध्ये युजरला मायक्रोसॉफ्टचं अकाउंटदेखील मिळतं. जर तुम्ही विंडोज कम्युटर किंवा इतर कोणताही मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट वापरत असाल तर तुम्हाला वन ड्राईव्ह स्टोरेजसोबत ऑफिस 365 चा अ‍ॅक्सेस पॅकेज मिळेल.

  त्यानंतर Recover वर क्लिक करा. अशाप्रकारे डिलीट झालेले कॉन्टॅक्ट पुन्हा रिकव्हर करता येतील.

  त्यानंतर Recover वर क्लिक करा. अशाप्रकारे डिलीट झालेले कॉन्टॅक्ट पुन्हा रिकव्हर करता येतील.

  3. MEGA 20 GB storage

  मेगा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, जो युजर्सना 20 जीबीपर्यंत फ्री क्लाउड स्टोरेज देतो. एक्स्ट्रा स्टोरेज मिळवण्यासाठी रेफर कोडचा वापर करता येतो. हा रेफर कोड वापरून 5 जीबीपर्यंत एक्स्ट्रो स्टोरेज मिळेल. इतर स्टोरेज ऑप्शनप्रमाणे मेगामध्येही फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स स्टोअर करता येतील परंतु यामध्ये ऑफिस अ‍ॅप्स मिळणार नाहीत.

  4. ICE Drive 20 GB

  स्टोरेजमधील डेटा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ICE Drive हा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. ई-मेल आयडीच्या मदतीने अकाउंट उघडल्यानंतर युजर्सना 10 GB स्टोरेज वापरता येतं.

  तर, हे आहेत फ्री क्लाउड स्टोरेज ऑप्शन. आता तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या चारपैकी कोणताही ऑप्शन निवडून तुमचा डेटा सेव्ह करू शकता.

  First published:

  Tags: Smart phone, Technology