Cambridge Analytica विरोधात CBI कडून गुन्हा दाखल, फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

Cambridge Analytica विरोधात CBI कडून गुन्हा दाखल, फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

सीबीआयने याच प्रकरणात आणखी एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चचंही नाव FIR मध्ये दाखल आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जानेवारी : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयने (CBI) युकेस्थित कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकाविरुद्ध (Cambridge Analytica) 5.62 लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा खासगी डेटा चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने याच प्रकरणात आणखी एक कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्चचंही नाव FIR मध्ये दाखल आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी यापूर्वी संसदेत फेसबुक केंब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी होईल असं सांगितलं होतं. सीबीआयला दिलेल्या जबाबात सोशल मीडिया कंपनीने, GSRL ने बेकायदेशीपणे भारतातील सुमारे 5.62 लाख वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा जमा केला आणि तो केंब्रिज अ‍ॅनालिटिकासोबत शेअर केल्याचं सांगतिलं. कंपनीने त्या आकडेवारीचा वापर भारतात निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

(वाचा - 68 वर्षीय पुतिन यांची 37 वर्षांची गर्लफ्रेंड; कोण आहे जिच्यावर सरकारी तिजोरीतून खर्चाचा होतोय आरोप)

काय आहे प्रकरण -

मार्च 2018 मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्मनी Cambridge Analytica चे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांचा हवाला देत, कंपनीने त्यांच्या परवानगीशिवाय 50 मिलियनहून अधिक वापरकर्त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधून खासगी माहिती चोरी केल्याचं सांगितलं. त्यानंतर सीबीआयने आरोपांबाबत केंब्रिज अ‍ॅनालिटिका आणि जीएसआरएलविरुद्ध (GSRL) प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

(वाचा - कबड्डी स्पर्धेदरम्यान दुर्घटना; मॅच सुरू असतानाच खेळाडूचा मृत्यू)

Cambridge Analytica वर आरोप आहे की, त्यांनी चुकीच्या पद्धतीने 5 कोटीहून अधिक युजर्सच्या प्रोफाईल्समधून माहिती एकत्र करून निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनच्या एजेन्सी फेसबुक आणि क्रेंबिज  अ‍ॅनालिटिकाची चौकशी करत आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: January 22, 2021, 11:27 AM IST

ताज्या बातम्या