• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Spotify ची धमाकेदार ऑफर, युजर्सला मिळणार 3 महिन्यांचे मोफत Subscription; असं करा Apply

Spotify ची धमाकेदार ऑफर, युजर्सला मिळणार 3 महिन्यांचे मोफत Subscription; असं करा Apply

ही ऑफर Spotify आणि Visa या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या युजर्ससाठी जारी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता युजर्सला कोणतेही चार्जेस न देता 3 महिने Spotify अ‍ॅपचे मोफत Subscription मिळेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : प्रसिद्ध Audio अ‍ॅप Spotify ने युजर्ससाठी एक बंपर ऑफर जारी केली आहे. या ऑफरमुळं युजर्सला 3 महिन्यांपर्यंतचं Subscription मोफत मिळणार आहे. ही ऑफर Spotify आणि Visa या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या युजर्ससाठी जारी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता युजर्सला (spotify premium Subscription on smartphone) कोणतेही चार्जेस न देता 3 महिने Spotify अ‍ॅपचे मोफत Subscription मिळेल. परंतु त्यासाठी युजर्सकडे Visa कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या Subscription मुळं युजर्सला Spotify वरील हजारो नव्या आणि सदाबहार (spotify free premium offer for 3 month) गाण्यांचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर मल्टी-डिवाइस सपोर्टचीही सुविधा या प्लॅनमध्ये असणार आहे. या ऑफरमध्ये युजर्सला गाणी ऐकण्यापासून तर ग्रुप सेशन अटेंड करण्यापर्यंतचे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

  40000 रुपयांपर्यंत बजेट लॅपटॉप खरेदी करायचाय? हे आहेत सर्वात BEST पर्याय

  कशी असेल प्रोसेस? त्यासाठी Spotify युजर्सला स्वत: च्या पर्सनल अकाउंटवरून साइन इन करावं लागेल. त्यानंतर visa card ची योग्यरित्या डिटेल्स भरावी लागेल. त्याचबरोबर याआधी जर युजरने Spotify च्या कुठल्याही फ्री ऑफरचा लाभ घेतलेला असेल तर त्या युजर्ससाठी ही ऑफर लागू होणार नाही.

  Telegram चे नवे अपडेट जारी, हे अ‍ॅप देतंय WhatsApp पेक्षाही वरचढ फीचर्स

  कसं कराल या ऑफरसाठी Apply? त्यासाठी सर्वात आधी Spotify अ‍ॅपचं ऑफर पेजला ओपन करा. त्यानंतर Start Trial च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तीन महिन्यांच्या ऑफरला सेलेक्ट करून त्याठिकाणी दिलेल्या डिटेल्स योग्यरित्या भरून लॉगिन करा. त्यानंतर ही ऑफर युजर्ससाठी लागू करण्यात येईल. तीन महिन्यांच्या मोफत ट्रायलनंतर हे Subscription सुरू ठेवण्यासाठी युजर्सला दरमहा 119 रूपये भरावे लागतील.

  तुम्ही Google Pay चा UPI पिन विसरलाय? पाहा नवीन PIN सेट करण्याची सोपी प्रोसेस

  सध्या Spotify ने Mini, फॅमिली (spotify family plan) आणि Individual सह चार Subscription प्लॅन घोषित केलेले आहे. मिनी Plan साठी Subscription चा दर 7 प्रतिदिवस आहे. हा Plan सिंगल अकाउंटसाठी असणार आहे. त्याचबरोबर फॅमिली Plan हा दरमहा 199 रूपयांचा देण्यात येत आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: