नवी दिल्ली, 14 जून : ऐन उन्हाळ्यात अतिशय उष्णता (Heat) जाणवत असताना, जर एक पोर्टेबल फॅन मिळाला तर किती दिलासादायी वाटेल आणि उकाड्यापासून देखील सुटका होईल. आता नवा पोर्टेबल फॅन बाजारात उपलब्ध झाला असून, तो तुम्ही कुठेही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता. चीनमधील टेक्नॉलॉजी कंपनी शाओमीने (Xiaomi) हा पोर्टेबल फॅन (Portable Fan) मागील वर्षी लॉन्च केला आहे. शाओमी ही कंपनी स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, पॉवरबॅंक, वॉशिंग मशीन आणि नोटबुक या उत्पादनांसाठी प्रसिध्द आहे.
Portable Hand Fan -
आकार (Size) -
शाओमीचा हा पोर्टेबल हँड फॅन आकाराने लहान आणि वजनाने हलका आहे. या हँड फॅनचं वजन केवळ 155 ग्रॅम आहे. त्यामुळे तुम्ही हा फॅन अगदी सहजतेने बॅगेमध्ये घेऊन कुठेही जाऊ शकता. तसंच या फॅनमध्ये एक व्हर्टिकल स्टँड (Vertical Stand) देण्यात आला असून, याआधारे तो जमिनीवर उभा करुन ठेवू शकता. तसंच या पोर्टेबल हँड फॅनमध्ये तुम्ही कुलरप्रमाणे पाणी भरुन त्याचा वापर करु शकता. कंपनीने हा फॅन गुलाबी, हिरवा आणि काळ्या रंगात उपलब्ध करुन दिला आहे.
स्पीड कंट्रोल गिअर (Speed Control Gear) -
शाओमी कंपनीच्या या हँड फॅनमध्ये 3 स्पीड गियर आहेत. या गियरने युजर फॅनचा स्पीड कमी - अधिक करू शकतात. पहिल्या गिअरमध्ये फॅन 3200 RPM वेगात फिरतो. दुसऱ्या गिअरमध्ये 4100 RPM, तर तिसऱ्या गिअरमध्ये 5100 RPM वेगात फिरतो.
फॅनचे फिचर्स (Features) -
या हँड फॅनमध्ये पाणी भरण्याचा ऑप्शन दिला गेला आहे. याचा वापर केल्यास तापमान 3 डिग्रीपर्यंत कमी करू शकता. शाओमीने या फॅनमध्ये 2000 mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी पहिल्या गिअरमध्ये 12 तास, दुसऱ्या गिअरमध्ये 9 तर तिसऱ्या गिअरमध्ये 3.4 तास बॅकअप देऊ शकते.
मोटर (Motor) -
कंपनीने या हँड फॅनमध्ये दमदार ब्रेशलेस मोटरचा वापर केला आहे. यामुळे विजेची तर बचत होतेच, परंतु फॅन सुरू असताना त्याचा आवाजही येत नाही. या प्रकारात उपलब्ध असलेल्या अन्य उत्पादनांच्या तुलनेत या फॅनमधील मोटर 50 टक्के अधिक पॉवरफुल आहे, असा दावा शाओमीने केला आहे. तसंच ही मोटार दिर्घकाळ वापरुन देखील गरम होत नाही.
किंमत -
शाओमीने आपल्या या पोर्टेबल हँड फॅनला DOCO Ultrasonic Dry Misting असं नाव दिलं आहे. या फॅनची भारतीय बाजारातील किंमत केवळ 750 रुपये आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news