मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सॅमसंग, वनप्लसच्या 'या' इअरबड्सवर मिळतेय भरघोस डिस्काउंट

सॅमसंग, वनप्लसच्या 'या' इअरबड्सवर मिळतेय भरघोस डिस्काउंट

सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये (Amazon Sale) इअर बड्सवर दोन सर्वोत्तम डील्स उपलब्ध आहेत. इअरबड्स खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी याबाबतची माहिती अवश्य घ्यावी.

सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये (Amazon Sale) इअर बड्सवर दोन सर्वोत्तम डील्स उपलब्ध आहेत. इअरबड्स खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी याबाबतची माहिती अवश्य घ्यावी.

सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये (Amazon Sale) इअर बड्सवर दोन सर्वोत्तम डील्स उपलब्ध आहेत. इअरबड्स खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी याबाबतची माहिती अवश्य घ्यावी.

सध्या भारतीय बाजारपेठेत विविध कंपन्यांचे वैशिष्टयपूर्ण फीचर्स असलेले इअरबड्स (Earbuds) उपलब्ध आहेत. तरुणाईकडून इअरबड्सला चांगली पसंती मिळते. विशेषतः ड्रायव्हिंग करताना इअरबड्सचा वापर फायदेशीर ठरतो. ग्राहकांची मागणी आणि गरज ओळखून कंपन्या खास फीचर्सचे इअरबड्स लॉंच करत असतात. सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये (Amazon Sale) इअर बड्सवर दोन सर्वोत्तम डील्स उपलब्ध आहेत. इअरबड्स खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी याबाबतची माहिती अवश्य घ्यावी. सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्रो (Samsung Galaxy Buds Pro) आणि वनप्लस बड्स प्रोवर (Oneplus Buds Pro) प्रथमच भरपूर डिस्काउंट देण्यात आला आहे. या दोन्ही इअरबड्समध्ये जबरदस्त फीचर्स (Features) देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे यात 99 टक्के अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजीचा (Active Noise Cancellation Technology) वापर करण्यात आला आहे. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सॅमसंग गॅलेक्सी बड्स प्रो आणि वनप्लस बड्स प्रो अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या बड्सच्या खरेदीवर जबरदस्त डिस्काउंटव्यतिरिक्त 1250 रुपयांचा कॅशबॅकही (Cashback) ग्राहकांना मिळणार आहे. अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन ही हेडफोन आणि इअरबड्समध्ये वापरली जाणारी सर्वांत लोकप्रिय टेक्नॉलॉजी आहे. यामुळे हेडफोनमध्ये बाहेरचा आवाज, बॅकग्राउंड नॉइज किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नाही. ही टेक्नॉलॉजी या दोन बड्समध्ये वापरण्यात आली आहे. (Safe Physical Relation बाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा) वनप्लस बड्स प्रो ब्लूटूथ ट्रुली वायरलेस इन इअर इअरबड्स विथ माइक (मेटल ब्लॅक) वनप्लस कंपनीनं नुकताच लॉंच केला आहे. याची किंमत दहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या इअरबड्सची किंमत 11,999 रुपये आहे. परंतु, डीलमध्ये 25 टक्के डिस्काउंट (Discount) देण्यात आल्याने हे बड्स तुम्ही 8990 रुपयांत खरेदी करू शकता. या इअरबड्समध्ये स्मार्ट अ‍ॅडाप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी वापरली आहे. यामुळे 40dB पर्यंतचा आवाज हे बड्स ऑटोमॅटिकली ओळखून अ‍ॅडजस्ट करू शकतात. या बड्समध्ये पॉवरफुल पंची बास (Punchy Bass) आणि ड्युएल 11 mm डायनॅमिक ड्रायव्हर्स (Dynamic Drivers) आहेत. यामुळे साउंडचा दर्जा उत्तम मिळतो. या बड्समधली बॅटरीदेखील दर्जेदार आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ती 38 तासांपर्यंत चालते. तसेच यात क्विक रॅप चार्जिंग आहे. यामुळे 10 मिनिटांत 10 तास पुरेल इतकी बॅटरी चार्ज होते. सॅमसंग गॅलेक्सी बड्सप्रो अ‍ॅमेझॉन सेलमध्ये उपलब्ध आहेत. 17,999 रुपये किमतीचे हे बड्स 53 टक्के डिस्काउंटनंतर 8490 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. हे बड्स ब्लॅक, व्हाईट आणि पर्पल या रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहेत. एयू स्मॉल फायनान्स बॅंकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास 1500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. या बड्समध्ये 99 टक्के नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी आहे. यामुळे तुम्हाला तीन मायक्रोफोन आणि एक व्हॉइस पिकअप युनिट मिळेल. या टेक्नॉलॉजीमुळे व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल केला असता समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. गॅलेक्सी बड्स प्रोमध्ये विंड शील्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात 360 ऑडिओ डॉल्बी हेड ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी (Dolby Head Tracking Technology) देण्यात आली आहे. तुम्ही सॅमसंग फोन किंवा टॅबवर एखादा व्हिडिओ बघताना दुसऱ्या दिशेला वळून पाहिलं तर व्हिडिओ ऑटोमॅटिक पॉज होईल. याशिवाय हे बड्स सॅमसंग डिव्हाइसेस मध्ये ऑटोमॅटिकली स्विच होऊ शकतील.
First published:

पुढील बातम्या