नवी दिल्ली, 28 एप्रिल : कोरोनाच्या संसर्गाने देशभर अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनसाठी, औषधांसाठी मेडिकल दुकानांबाहेर, लसीकरण केंद्रांवर लशीसाठी आणि स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारांसाठी लोक रांगा लावून उभे आहेत. अशा स्थितीत आपल्या माणसांकरता मदत मिळवण्यासाठी अनेक लोक ऑक्सिजन सिलिंडर, औषधं, प्लाझ्मा आदींसाठी सोशल मीडियावर आवाहन करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, News18ने काही सोशल मीडिया पेजेस आणि लिंक्स एकत्र केल्या आहेत. त्या माध्यमातून मदत मिळवणं, माहिती मिळवणं सोपं होऊ शकेल.
Covid Aid Resources, India : याइन्स्टाग्राम पेजवर देशभरातले प्लाझ्मा डोनर, ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, होमकेअर सेवा, हॉस्पिटल बेड्स, सॅनिटेशन सर्व्हिस आदींची माहिती मिळेल.
View this post on Instagram
Covid 911 : या इन्स्टाग्राम पेजवर प्रामुख्याने दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये रेमडेसिवीर, फॅबिफ्लू यांसारख्या औषधांच्या उपलब्धते बद्दल माहिती दिली जात आहे. ऑक्सिजन कंटेनरच्या संदर्भात ताज्या आणि खात्रीशीर बातम्याही या पेजवर शेअर केल्या जात आहेत. हॉस्पिटल्स आणि अँब्युलन्स बद्दलची माहितीही शेअर केली जात आहे.
View this post on Instagram
Covid India Resources - या वेबसाइटवर कोरोना पेशंटसाठी जेवणाची सोय, टेस्टिंग सेंटर, आयसीयू बेड्स, डॉक्टर्सना बोलावणं आदीं बद्दलची माहिती मिळू शकते.
View this post on Instagram
Sprinklr - स्प्रिंक्लर या वेबसाइटवर ऑक्सिजन, आयसीयू बेड्ससह देशभरात आवश्यक औषधं कुठे मिळू शकतात, याची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाइटच्या डॅशबोर्डवर जाऊन आपलं शहर सिलेक्ट करून शहरातले ऑक्सिजन सिलिंडर्स, बेड्स, औषधं, प्लाझ्मा आदींच्या उपलब्धते बद्दलची माहिती मिळू शकेल. https://external.sprinklr.com/insights/explorer/dashboard/601b9e214c7a6b689d76f493/tab/16?id=DASHBOARD_601b9e214c7a6b689d76f493&home=1
Twitter India - ट्विटर इंडियाने आपलं कोविड-19 रिसोर्स पेज सुरू केलं आहे. त्यात SOS call आणि ट्विटची सुविधा आहे. अँब्युलन्स, ऑक्सिजन, औषधं, आयसीयू बेड्स आदींची गरज असलेल्या पेशंटना या सुविधेचा उपयोग होतो.
Covid Relief - कोरोना काळात ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, ते या मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करू शकतात. त्यात स्टेट हेल्पलाइन, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता, प्लाझ्मा डोनर आणि अँब्युलन्सची उपलब्धता आदींची माहिती मिळू शकते.
Dhoondh - कोरोना रुग्ण आणि प्लाझ्मा डोनर इथे आपली नोंदणी करू शकतात. www.dhoondh.com
Chandigarh - या पेजवर चंडीगढमधले प्लाझ्मा डोनर्स, औषधं आणि ऑक्सिजन सिलिंडर्सची उपलब्धता यांची ताजी माहिती दिली जात आहे.
View this post on Instagram
Allahabad - या पेजवर प्रयागराज (अलाहाबाद) या शहरातील प्लाझ्मा डोनर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, नेब्युलायझर, ऑक्सिमीटर आदींची माहिती, मदत मिळू शकते.
View this post on Instagram
Lucknow - या इन्स्टाग्राम पेजवर लखनौमधल्या प्लाझ्मा डोनर्सचे नंबर्स आणि आवश्यक औषधांच्या उपलब्धतेची माहिती मिळेल.
View this post on Instagram
Bhopal - www.bhopalplasmasupport.in/ या वेबसाइटवर प्लाझ्मा डोनर्स आणि ऑक्सिजनची माहिती मिळेल.
Mumbai - या पेजवर मुंबईतली भोजनाची ठिकाणं, ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आदींची माहिती आहे.
View this post on Instagram
Jharkhand - झारखंड राज्यातल्या ऑक्सिजन, औषधं, अँब्युलन्स आदी सेवांच्या उपलब्धतेची माहिती या पेजवर आहे.
View this post on Instagram
Hyderabad - हैदराबादमधल्या कोविड-19च्या संसाधनांची माहिती या पेजवर आहे.
View this post on Instagram
कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी भोजन सुविधेची माहिती -
View this post on Instagram
देश मोठ्या कठीण काळातून जातो आहे. गेले काही दिवस दररोज तीन लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोना मृतांचा आकडाही सतत वाढता आहे. या काळात अनेक मोठ्या कंपन्यांसह अनेक देशही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus