मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? या उपायांनी मिळवा परत

चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? या उपायांनी मिळवा परत

अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (solutions for money transfer in wrong bank account) होतात.

अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (solutions for money transfer in wrong bank account) होतात.

अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (solutions for money transfer in wrong bank account) होतात.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर (solutions for money transfer in wrong bank account) होतात. मात्र ते परत कसे मिळवायचे (How to get money return) हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळं अनेकदा मोठं आर्थिक नुकसान होतं आणि वेळेत पावलं न उचलल्यामुळे पैसे परत मिळण्याची शक्यतादेखील कमी होते. मात्र सध्याच्या (Many ways to get money back) डीजिटल युगात आपले पैसे परत मिळवण्याचे अनेक उपाय आहेत. तत्काळ बँकेला सूचना द्या जर तुमच्याकडून चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, तर तत्काळ तुमच्या बँकेला याची कल्पना द्या. फोन करून किंवा ईमेल पाठवून बँकेला या व्यवहाराची सविस्तर माहिती द्या. बँकेच्या कॉल सेंटरवर फोन करून त्यांना व्यवहाराचे सर्व आवश्यक ते तपशील पुरवा. त्यामध्ये व्यवहाराची वेळ, स्वरूप, खाते क्रमांक, वेळ, रक्कम, आयएफएससी कोड, बँक खाते क्रमांक अशी सर्व माहिती बँकेला द्या. ब्रँच मॅनेजरला भेटा जर तुम्ही चुकीचा IFSC कोड वापरून रक्कम ट्रान्सफर केली असेल, तर आपोआप तुमच्या खात्यात परत येईल. मात्र जर वेगळ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे. जर वेगळ्या बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, ते परत मिळायला अधिक वेळ लागू शकतो. अनेकदा इतर बँकांच्या खात्यात चुकून गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी दोन महिन्यांपर्यंतचा वेळही लागण्याची शक्यता असते. हे वाचा- 6 कॅमेरे आणि जबरदस्त प्रोसेसर असणाऱ्या या स्मार्टफोनवर तब्बल 8000 रुपयांची सूट स्वतः FIR ही करू शकता अनेकदा चुकून एखाद्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले तर ती व्यक्ती पैसे परत करायला तयार होते. मात्र अनेकदा असाही अनुभव येतो, की खातेदार पैसे परत द्यायला नकार देतो. अशा प्रसंगी आपण पोलिसांत तक्रार करू शकतो. एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय त्यामुळे खुला होतो.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bank, Digital services, Technology

    पुढील बातम्या